जिल्हा आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:04 AM2021-01-01T04:04:22+5:302021-01-01T04:04:22+5:30

आरोग्यमंत्री : पदभरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे आरोग्यमंत्री ...

The district health system should now focus on non-covid patient care | जिल्हा आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे

जिल्हा आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे

Next

आरोग्यमंत्री : पदभरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

जिल्हा आरोग्य यंत्रणेने आता नॉन कोविड रुग्णसेवेकडे लक्ष द्यावे

आरोग्यमंत्री : पदभरती प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेवर्क

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असून, सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णांच्या सेवेकडे लक्ष द्यावे. सेवेचा दर्जा उंचावतानाच सौजन्यपूर्ण वागणूक सामान्यांना द्यावी. आरोग्य विभागाच्या महत्त्वाच्या योजनांच्या माहितीचा फलक प्रत्येक ग्रामपंचायतीवर लावावा. दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

विभागातील पदभरतीला गती मिळावी यासाठी आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, मागासवर्ग कक्षाचे अधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ. साधना तायडे, डॉ. अर्चना पाटील, सहआयुक्त डॉ. सतीश पवार, आदी उपस्थित होते.

आरोग्यमंत्र्यांनी यंत्रणेला अधिक सक्षमपणे आणि सेवेचा दर्जा उंचावण्याचे आवाहन केले. राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेने नॉन कोविड रुग्णसेवेकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. अनेक दिवसांपासून मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रलंबित आहेत, त्या तातडीने कराव्यात. मोबाईल सर्जिकल युनिट सुरू करावे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आरोग्यासंदर्भात राष्ट्रीय कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज असून, राज्य आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी संनियंत्रणाची प्रणाली विकसित करावी. जेणेकरून प्रत्येक अधिकाऱ्याचे कार्यमूल्यमापन करता येईल. यासाठी संगणक प्रणाली तयार करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

* औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ

आरोग्य संस्थांसाठी आवश्यक असणाऱ्या औषध खरेदीसाठी स्वतंत्र महामंडळ करण्याचा मानस असून, त्यासाठी तमिळनाडू आणि राजस्थान या राज्यांचा अभ्यास करावा, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले.

-----------------------

Web Title: The district health system should now focus on non-covid patient care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.