महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसचा मोर्चा

By Admin | Updated: January 21, 2015 22:37 IST2015-01-21T22:37:01+5:302015-01-21T22:37:01+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत,

District Congress Front Against Inflation | महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसचा मोर्चा

महागाईविरोधात जिल्हा काँग्रेसचा मोर्चा

अलिबाग : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत, त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नवीन भूसंपादन कायद्यातील तरतुदी या शेतकरी आणि भूमी मालकांवर अत्याचार करणाऱ्या आहेत, त्या रद्द करण्यात याव्यात या मागण्यांसाठी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
केंंद्र सरकार जनतेची फसवणूक आणि लुबाडणूक करीत आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस रस्त्यावर उतरली.
अलिबाग येथील काँग्रेस भुवनच्या मुख्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली. हिराकोट तलाव परिसरात पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यानंतर कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्ट मंडळाने जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांची भेट घेवून निवेदन दिले.
आघाडी सरकारच्या काळात भूसंपादनाचा नवा कायदा पारित झाला होता. मात्र भाजपा सरकारने त्या कायद्यात बदल करुन, त्यांचे उद्योगांचेच हित जपण्याचे धोरण असल्याची टीका यावेळी काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

Web Title: District Congress Front Against Inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.