Join us  

दुचाकी खरेदी करताना हेल्मेट देण्याची जबाबदारी वितरकाची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 6:53 AM

राज्यात दुचाकी खरेदी करताना त्यावर हेल्मेट देण्याची जबाबदारी ही वितरकाची (डीलर) असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली आहे.

मुंबई - राज्यात दुचाकी खरेदी करताना त्यावर हेल्मेट देण्याची जबाबदारी ही वितरकाची (डीलर) असल्याची माहिती परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी दिली आहे. वर्षभरात एकही अपघात न करणाऱ्या चालकांना वाहन विम्यात सूट देण्याचे विचाराधीन असल्याची महत्त्वाची माहितीही चन्ने यांनी मुंबई प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत दिली.पोलीस अधीक्षक (महामार्ग) विजय पाटील म्हणाले, शिक्षणात वाहतूक नियमांची माहिती देण्याची गरज आहे. रस्ते अपघातांची वाढती संख्या कमी करण्यासाठी चांगले रस्ते आणि चांगल्या वाहनांसोबत नियंत्रितपणे वाहन चालवणाºयांचीही गरज आहे. केंद्र शासनाने २०१६ मध्येच दुचाकीसोबत हेल्मेट देण्याची तरतूद केलेली आहे. यासंदर्भात तक्र ारी आल्यानंतर त्याचा खुलासाही घेतला जात आहे. दुचाकी विकत घेताना त्यासोबत हेल्मेट देण्याची जबाबदारी ही वितरकाची असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.परिवहन आयुक्त शेखर चन्ने म्हणाले, वाहतूक नियमांच्या पायमल्लीमुळेच मोठ्या संख्येने अपघात होत आहेत. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणाºयांना वाहन विम्यात सूट दिल्यास नक्कीच नियमांचे पालन करणाºयांच्या संख्येत वाढ होईल. यासंदर्भात शासन स्तरावर विचार करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आॅटोमोबाइल क्षेत्रावरही त्यांनी टीका केली. बरेच वाहनचालक हेल्मेट ठेवायला जागा नसल्याने हेल्मेट वापरत नसल्याची माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले....तर चालक करतील हेल्मेटचा वापरदुचाकीच्या हेडलाईट, सीट आणि एकंदरीत रचनेवर काम करणाºया कंपन्यांनी हेल्मेट ठेवण्यासाठी अद्याप कुठल्याही प्रकारचा बदल केल्याचे दिसत नाही, अशी खंत परिवहन आयुक्त चन्ने यांनी व्यक्त केली. तसेच यावरही संशोधन केल्यास नक्कीच मोठ्या संख्येने दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करतील, असे ते म्हणाले.

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई