नव्या चिखलवाडीतल्या जुन्या रहिवाशांना ताबापत्र आणि चावी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:06 IST2021-01-23T04:06:12+5:302021-01-23T04:06:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या इमारती, चाळी, झोपड्यांचा पुनर्विकास विविध कारणाने अनेक वर्षे रखडत ...

नव्या चिखलवाडीतल्या जुन्या रहिवाशांना ताबापत्र आणि चावी वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या इमारती, चाळी, झोपड्यांचा पुनर्विकास विविध कारणाने अनेक वर्षे रखडत असतो. परिणामी येथील रहिवाशांना अनेक वर्षे लगतच्या वस्तीत, भाड्याच्या घरात अथवा इतरत्र वास्तव्य करावे लागते. अनेक वेळा प्राधिकरणांनी हालचाली केल्यास पुनर्विकास मार्गीसुद्धा लागतो. ग्रँटरोड येथील नव्या चिखलवाडीतल्या रहिवाशांना अशाच एका प्रकरणात दिलासा मिळाला आहे.
म्हाडा कार्यालय आणि अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या २०१० आणि २०१३ साली दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी चिखल वाडी, ग्रँट रोड येथील ए. आर.पी. इमारत क्रमांक एकचा पुनर्विकास आणि एकूण ४४ रहिवाशांचे पुनर्वसन नवीन इमारत क्रमांक दहामधील एकूण ११२ गाळ्यांमधील ४४ गाळ्यांमध्ये करण्यात आले आणि जुन्या रहिवाशांचे ताबापत्र आणि चावी वाटप म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.