वांद्रे पूर्व मध्ये अन्नधान्य व किराणा वस्तुंचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 21:16 IST2020-03-26T21:16:25+5:302020-03-26T21:16:25+5:30
वांद्रे पूर्व मध्ये अन्नधान्य व किराणा वस्तुंचे वितरण

वांद्रे पूर्व मध्ये अन्नधान्य व किराणा वस्तुंचे वितरण
वांद्रे पूर्व मध्ये किराणा व अन्नधान्याच्या पाकिटांचे वितरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे सुरु असलेल्या संचारबंदीचा फटका दररोज काम करुन पैसे कमावणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. हातावर पोट असणाऱ्या गरीबांना, मजुरांना लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून अन्नधान्य, किराणाची पाकिटे बनवून वितरण करण्यात येत आहे.
वांद्रे पूर्व मध्ये कॉंग्रेसचे स्थानिक आमदार झीशान सिद्दीकी यांनी अशा व्यक्तींच्या सहाय्यासाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार घरांपर्यंत अन्नधान्य व किराणा पोचवण्याचे नियोजन करण्यात आले असून वितरणाला प्रारंभ करण्यात आल्याची माहिती सिद्दीकी यांनी दिली.
कोरोनाचे संकट हे समाजावर, देशावर व जगावर आलेले मोठे संकट आहे त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या परीने गरजूंना मदत करुन माणुसकीचेे दर्शन घडवावे असे आवाहन सिद्दीकी यांनी केले आहे.