सायन-पनवेल मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:08 IST2021-09-14T04:08:33+5:302021-09-14T04:08:33+5:30

मुंबई : सायन-पनवेल मार्गावर मान खुर्द जंक्शन येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. येथील मुख्य सिग्नलजवळ असलेला पेव्हर ...

Disruption of potholes on Sion-Panvel route | सायन-पनवेल मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

सायन-पनवेल मार्गावर खड्ड्यांचे विघ्न

मुंबई : सायन-पनवेल मार्गावर मान खुर्द जंक्शन येथील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. येथील मुख्य सिग्नलजवळ असलेला पेव्हर ब्लॉकचा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे, तर चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरदेखील मोठे खड्डे पडले आहेत. सणासुदीच्या दिवसांतच वाहनचालकांना या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वाहनचालक त्रासले आहेत. मुख्यतः दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मागील काही दिवसांपासून या मार्गावरून वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गणपती विसर्जन मिरवणुकांनादेखील या खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होत आहे. हे खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: Disruption of potholes on Sion-Panvel route