बिरवाडी परिसरात १६ तास वीज पुरवठा खंडित

By Admin | Updated: May 29, 2014 00:56 IST2014-05-29T00:56:12+5:302014-05-29T00:56:12+5:30

महाड तालुक्यातील बिरवाडी, काळीज, खरवली, ढालकाठी परिारात सुमारे १६ तास दोन दिवस सतत विद्युत पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत

Disrupted power supply for 16 hours in Birwadi area | बिरवाडी परिसरात १६ तास वीज पुरवठा खंडित

बिरवाडी परिसरात १६ तास वीज पुरवठा खंडित

औरंगाबाद : घाटी रुग्णालयावर दररोज रुग्णांचा ताण वाढत आहे. त्यामुळे शासनाने चिकलठाणा येथे सामान्य रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. २०० खाटांच्या या रुग्णालयाच्या इमारतीचे काम ८० टक्के पूर्ण होत आले आहे. उर्वरित काम आणि रंगरंगोटी डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. डी. एन. पाटील यांनी वर्तविला. मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमधून रुग्ण घाटीत येतात. रुग्णांचे लोंढे थांबविणे अशक्य आहे. त्यापेक्षा घाटीचा ताण कमी करण्यासाठी चिकलठाणा येथे दोनशे खाटांचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. आरोग्य विभागाची गरज लक्षात घेऊन शासनानेही त्वरित या नवीन रुग्णालयास मान्यता दिली. त्याचप्रमाणे इमारतीच्या बांधकामासाठी तब्बल ३९ कोटी रुपये मंजूरही करण्यात आले. एक वर्षापूर्वी या इमारतीचे कामही सुरू झाले. काम ८० टक्के होत आले असून, डिसेंबरपर्यंत इमारतीचे काम पूर्ण होईल. जानेवारी २०१५ मध्ये रुग्णालयाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. पदनिर्मितीचे कामही सुरू वर्ग-१ अंतर्गत पदे -१४, वर्ग-२ मध्ये २८ व इतर ३५० वेगवेगळ्या पदांचा समावेश राहणार आहे. १० हजार चौरस फुटांत चार मजली इमारत राहणार. रेडिआॅलॉजी, सर्जरी, बालरोग, स्त्रीरोग, मेडिसीन, भूलशास्त्र विभाग येथे असणार आहेत. जळालेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था. अपघात विभाग, रुग्णांच्या दिमतीला रुग्णालयात सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनोग्राफी, आदी महागडी यंत्रसामग्री, तसेच पॅथॉलॉजीचीही सोय राहणार आहे. मिनी घाटी राहणार रुग्णांना चांगली आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी शासनाने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून शहरापासून ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यात येत आहे. आरोग्य सेवेला केंद्र शासनाच्या राष्टÑीय ग्रामीण आरोग्य अभियानाची जोड देण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात चांगली आरोग्य सेवा मिळावी यादृष्टीने चिकलठाण्यात २०० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. हे रुग्णालय मिनी घाटीसारखे असावे, अशी संकल्पना शासनाची आहे. ४ा्रामीण भागातून येणार्‍या रुग्णांना सर्व सोयी-सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. रुग्णालयात सेंट्रल आॅक्सिजन यंत्रणा, लिफ्ट, ट्रामा केअरसह अग्निशमन यंत्रणाही उभारण्यात येईल.

Web Title: Disrupted power supply for 16 hours in Birwadi area