सार्वजनिक मंडळांच्या हक्कावरून युतीमध्ये वाद
By Admin | Updated: July 14, 2015 01:40 IST2015-07-14T01:40:59+5:302015-07-14T01:40:59+5:30
मुंबईत एलईडी दिव्यांवरून युतीमध्ये ‘टिष्ट्वटर’युद्ध सुरू असताना आता नवीन वादाला तोंड फुटले आहे़ रस्त्यांवर मंडप आणि ध्वनिप्रदूषणावरून न्यायालयाने राज्य

सार्वजनिक मंडळांच्या हक्कावरून युतीमध्ये वाद
मुंबई : मुंबईत एलईडी दिव्यांवरून युतीमध्ये ‘टिष्ट्वटर’युद्ध सुरू असताना आता नवीन वादाला तोंड फुटले आहे़ रस्त्यांवर मंडप आणि ध्वनिप्रदूषणावरून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारल्यानंतर धोरण तयार करण्यात येत आहे़ याबाबत शिवसेनेच्या उत्सव समन्वय समितीने भाजपाला लक्ष्य केले होते़ त्यास प्रत्युत्तर देताना या प्रकरणी न्यायालयात अथवा आयुक्तांना दाद न मागणारे मंडळांना काय वाचवणार? असा टोला भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अॅड़ आशिष शेलार यांनी सोमवारी लगावला़
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्सव साजरे करण्यासाठी महापालिका धोरण तयार करीत आहे़ हे धोरण सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौ आणि दहीहंडी उत्सवांना लागू होणार आहे़ यात रस्त्यावरील मंडप, ध्वनीची मर्यादा, स्पीकर, रस्त्यावरील खड्डे यांबाबतही निर्णय होणार आहे़ या धोरणानुसार गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांना परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे़ या प्रकरणी भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्त अजय मेहता यांची आज भेट
घेतली़
या वेळी पत्रकारांशी बोलताना अॅड़ शेलार यांनी, भाजपा चिखलफेक करीत नाही; पण मंडळांसाठी जे न्यायालयात जात नाहीत, पालिका आयुक्तांना भेटत नाहीत, ते काय मंडळांना वाचवणार? असा टोला शिवसेनेच्या मंडळांनी रविवारी केलेल्या आरोपांना उत्तर देताना हाणला़ सण साजरे करताना मंडळांना अडचण येणार नाही़ आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे अॅड़ शेलार यांनी
सांगितले़ (प्रतिनिधी)
भाजपाची खेळी
राज्यात भाजपा सरकार असताना भाजपाच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन शिवसेनेला कोंडीत पकडण्याची खेळी केली आहे़ रस्त्यावर मंडप असलेल्या ठिकाणीच सार्वजनिक मंडळांना तेवढ्याच आकाराचे मंडप उभारण्याची परवानगी धोरणातून देण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे़ तसेच गेल्या वर्षीपासून परवानगी देण्यात येणाऱ्या मंडळांना यंदाही अनुमती द्यावी, मात्र याचा त्रास अथवा नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचनाही अॅड़ शेलार यांनी केली़
जुने नियम केवळ कागदोपत्रीच पालिकेच्या नियमांप्रमाणे मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदता येत नाहीत़ खड्डे खोदल्यास दंड वसूल करण्याचीही तरतूद आहे़ गेल्या दोन वर्षांपासून
नवीन मंडळांना रस्त्यांवर मंडप लावण्यास अनुमती देण्यात येत
नाही़ मात्र या नियमांचे पालन होताना दिसत नाही़
नव्या धोरणामुळे मंडळे अडचणीत
मुंबईत सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत़ यापैकी ११ हजार मंडळांचे मंडप रस्त्यावरच आहेत़ त्यामुळे नवीन धोरणामुळे अशी मंडळेअडचणीत येऊ शकतात़ यामध्ये नवरात्रौत्सव आणि दहीहंडी मंडळांचाही समावेश आहे़