‘न पाहिलेल्या’ चित्रांचे प्रदर्शन; जॉन फर्नांडिस यांच्या कलाकृती

By admin | Published: May 13, 2014 05:30 AM2014-05-13T05:30:20+5:302014-05-13T05:30:20+5:30

कलाविश्वातील जॉन फर्नांडिस या प्रसिद्ध चित्रकाराच्या ‘न पाहिलेल्या’ चित्रांचा खजिना कलारसिकांसाठी खुला केला आहे. यांच्या कलाकृती राजा रविवर्मा यांच्याशी साधर्म्य पावणार्‍या आहेत, असे म्हटले जाते.

Display of 'unseen' pictures; The artwork of John Fernandes | ‘न पाहिलेल्या’ चित्रांचे प्रदर्शन; जॉन फर्नांडिस यांच्या कलाकृती

‘न पाहिलेल्या’ चित्रांचे प्रदर्शन; जॉन फर्नांडिस यांच्या कलाकृती

Next

मुंबई : कलाविश्वातील जॉन फर्नांडिस या प्रसिद्ध चित्रकाराच्या ‘न पाहिलेल्या’ चित्रांचा खजिना कलारसिकांसाठी खुला केला आहे. यांच्या कलाकृती राजा रविवर्मा यांच्याशी साधर्म्य पावणार्‍या आहेत, असे म्हटले जाते. त्यामुळे आता फर्नांडिस यांच्या ‘न पाहिलेल्या’ कलाकृती कलाप्रेमींना पाहता येतील. भारतीय कलाविश्वात जॉन यांचे नाव फारच आदराने घेतले जाते. त्यांच्या कलाकृतींना त्यांचे गुरू के. बी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले होते. त्यांच्याबरोबर जॉन यांनी पूर्णवेळ आर्टिस्ट म्हणून २५ वर्षे कार्य केले. फर्नांडिस यांच्या कलाकृती वास्तव जीवनावर आधारित होत्या. त्यांच्या चित्रांचे विषय कायम स्त्रीप्रधान असायचे. फर्नांडिस यांच्या चित्रातील स्त्री नेहमीच तिच्या चेहर्‍यावरील भावनांनी कलारसिकांना भुरळ घालत असे. स्त्रीची विविध रूपे आणि भावविश्व उलगडण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यांच्या चित्रांतील फॉर्म आणि कलरटोन्स वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या पत्नी अग्नेस फर्नांडिस सांगतात की, फर्नांडिस यांची चित्रे हा अत्यंत जिव्हाळ््याच्या आठवणी आहेत. या कलाकृती कधीच विक्रीस काढल्या गेल्या नाहीत. कारण त्यांच्याशिवाय जगणे ही कल्पनासुद्धा त्यांना सहन झाली नसती. जॉन फर्नांडिस यांच्या ‘न पाहिलेल्या’ चित्रांचे प्रदर्शन वाळकेश्वर येथील आर्ट देश गॅलरी येथे २० मेपर्यंत कलारसिकांसाठी खुले राहील. (प्रतिनिधी)

Web Title: Display of 'unseen' pictures; The artwork of John Fernandes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.