डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई

By Admin | Updated: November 2, 2014 01:49 IST2014-11-02T01:49:35+5:302014-11-02T01:49:35+5:30

घरात डेंग्यूचे डास आढळलेल्या 13 हजार 215 नागरिकांवर आतार्पयत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आह़े

Disease Action on 13 Thousand Citizen | डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई

डासामुळे 13 हजार नागरिकांवर कारवाई

मुंबई : घरात डेंग्यूचे डास आढळलेल्या 13 हजार 215 नागरिकांवर आतार्पयत कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आह़े मात्र डासांच्या अळ्या सापडल्यास घरमालकाला अटक करण्याचा इशारा देणा:या महापालिकेच्या अधिका:यांमध्येच या कारवाईबाबत संभ्रम दिसून येत आह़े
घरातील शाभेच्या वस्तूंमध्ये साठविलेले पाणी, पाण्याच्या टाक्या यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे उजेडात आले आह़े मात्र कायदेशीर कारवाईनेही जागरूकता वाढत नसल्याने रहिवाशांना अटक करण्याचा फतवा पालिकेने दोन दिवसांपूर्वी काढला होता़ परंतु अशी कारवाई शक्य आहे का, याबाबत अधिका:यांमध्येच संभ्रमाचे वातावरण आह़े 
चार जणांना अटक झाल्यास अन्य रहिवाशांना जरब बसेल़ घरामध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता लोकं घेतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त होत आह़े त्याचवेळी अटक करण्याचे काम पोलीस खात्याचे आह़े त्यात पालिकेने हस्तक्षेप का करावा, कोणत्या नियमांतर्गत ही अटक करायची, असा सवाल अधिकारी खाजगी विचारत आहेत़ (प्रतिनिधी)
 
मुंबईत आठवा बळी
केईएमच्या निवासी डॉक्टरचा नुकताच मृत्यू झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून नायर रुग्णालयात दाखल असलेल्या एका रुग्णाचा आज दुपारी 12 वाजता डेंग्यूमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण येथील परिचारिकेच्या पती आहे. संदीप गायकवाड असे त्याचे नाव आहे. ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 174 रुग्ण आढळून आले होते. शेवटच्या आठवडय़ामध्ये केईएममध्ये डॉ. श्रुती खोब्रागडे हिचादेखील डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. 
 
पालिकेची कारवाई व उपाययोजना
उच्चभ्रू वसाहती, झोपडपट्टी अशा विभागांमध्ये पाणी साचून डासांची पैदास होत आह़े याबाबत पालिकेने घेतलेल्या झाडाझडतीमध्ये एक हजार 282 ठिकाणी डासांच्या अळ्या सापडल्या़ या अळ्या नष्ट केल्या.
 
अशी होते कायदेशीर कारवाई
मलेरिया व डेंग्यू पसरविणा:या डासांची उत्पत्ती 
झाल्याचे आढळल्यास पालिका अधिनियम 1888 
कलम 381 अ व 381 ब द्वारे कारवाई करण्यात 
येत़े या अंतर्गत प्रथम रहिवाशांना नोटीस देण्यात येत़े त्यानंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयातून संबंधितांना समन्स काढण्यात येतो़ गुन्हेगार न्यायालयात हजर झाल्यास दंड आकारण्यात येतो़ मात्र समन्स मिळाल्यानंतरही न्यायालयात हजर न राहणा:याच्या नावे वॉरेंट काढले जात़े पोलीस त्यांना न्यायालयात हजर करतात़ मात्र कारवाईबाबत प्रशासनाने मौन बाळगले आह़े

 

Web Title: Disease Action on 13 Thousand Citizen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.