वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्याबाबत होणार चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:27 IST2021-02-05T04:27:28+5:302021-02-05T04:27:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : स्थानिक दबावात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले ...

वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा करण्याबाबत होणार चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक दबावात वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासह महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा होण्याबाबत गृहमंत्री तसेच विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत एक बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. इंटक संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर राऊत यांच्या उपस्थितीत वीज कंपनीच्या फोर्ट, मुंबई स्थित कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
व्याधी अथवा अपघातामुळे शारीरिकदृष्ट्या अक्षम झालेल्यांना स्वेच्छानिवृत्ती, रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा ग्राह्य धरणे, वीजबिल वसुलीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेणे, अभियांत्रिकी पदवी व पदविकाधारक तांत्रिक कर्मचाऱ्यांना कनिष्ठ व सहायक अभियंता या पदावर प्रतिनियुक्ती मिळण्यासह, निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत, रिक्त पदे भरणे आदी मागण्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.