Join us  

‘टिस’मधील आंदोलनाची सोशल मीडियावर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 5:26 AM

चेंबूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये वसतीगृह आणि मेसच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या विरोधात मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. १५ दिवसांपासून संस्थेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी ठाण मांडूण बसले आहेत.

मुंबई - चेंबूर येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये वसतीगृह आणि मेसच्या शुल्कामध्ये वाढ केल्याच्या विरोधात मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. १५ दिवसांपासून संस्थेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थी ठाण मांडूण बसले आहेत. या आंदोलनाला आता समाज माध्यमांवरून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर या आंदोलनाची माहिती सर्वत्र व्हायरल केली जात आहे. त्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.आंदोलनाचा प्रभाव वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यासाठी आंदोलनकर्त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप तयार केले आहेत. यात आयआयटीसारख्या नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेतले आहे. शुल्कवाढ मागे न घेतल्यास येत्या काळात उपोषाणालाही बसू, असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात हे आंदोलन अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.मेसच्या शुल्कात वाढ करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता सोशल मीडियावरून या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळत असून, सर्वत्र आंदोलन व्हायरल होत आहे.

टॅग्स :सोशल मीडियामुंबईविद्यार्थी