Join us  

यापुढे बरोबरीच्या दर्जानेच काँग्रेसशी चर्चा - आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:50 AM

लोकसभा निवडणूक स्वबळावर लढत काँग्रेस आघाडीला धक्का देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक स्वबळावर लढत काँग्रेस आघाडीला धक्का देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपल्याचे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर होईल, असे स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आठ ते दहा जागांवर फटका बसल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. भाजपाची बी टीम म्हणून काम केल्याचा ठपकाही ‘वंचित’वर ठेवला जात आहे. या संदर्भात आंबेडकर यांनी रविवारी टिष्ट्वट केले असून यापुढेही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवरच चर्चा करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला यापुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :प्रकाश आंबेडकरलोकसभा निवडणूक २०१९