कोस्टल रोडसाठी दावोसमध्ये चर्चा
By Admin | Updated: January 22, 2015 01:42 IST2015-01-22T01:42:11+5:302015-01-22T01:42:11+5:30
मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडच्या उभारणीकरिता तसेच राज्यातील पायाभूत सुविधांकरिता नोमुरा या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समुहाने सहकार्य करावे

कोस्टल रोडसाठी दावोसमध्ये चर्चा
मुंबई : मुंबईतील प्रस्तावित कोस्टल रोडच्या उभारणीकरिता तसेच राज्यातील पायाभूत सुविधांकरिता नोमुरा या वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या समुहाने सहकार्य करावे याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोमुराचे अध्यक्ष मिनोरू शिनोहारा व त्यांचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी विकास शर्मा यांच्याशी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ४५ व्या वार्षिक परिषदेत चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची जनरल इलेक्ट्रीक, नेस्ले, ह्योसंग, पेप्सीको, लॉरीयल, इस्पात, जेट्रो, डब्ल्यूईएफ, मित्सुई, नोवार्टिस, सॅफ्रन, कॉग्नीझंट या उद्योगसमुहांच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची पहिली बैठक नोमुराच्या अध्यक्षांशी झाली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी चर्चेत सहभागी झाले होते. ‘न्यू ग्लोबल कंटेक्स्ट’ हे यंदाच्या परिषदेचे सूत्र आहे. यंदाच्या वार्षिक बैठकीत सुरक्षा, स्थैर्य, विविध क्षेत्रातील सहकार्य यासह आर्थिक विकासाशी संबंधित विविध बाबींवर मंथन होणार आहे.