ग्रामीण भागात इंटरनेटवर अविश्वास!
By Admin | Updated: May 6, 2015 02:17 IST2015-05-06T02:17:12+5:302015-05-06T02:17:12+5:30
आॅनलाईन शॉपिंग आणि त्याबद्दलचे समज, गैरसमज यातील बाबी तपासण्यासाठी नुकताच ‘इ-मार्केटर’ या संस्थेने सर्वेक्षण केले.

ग्रामीण भागात इंटरनेटवर अविश्वास!
मुंबई : आॅनलाईन शॉपिंग आणि त्याबद्दलचे समज, गैरसमज यातील बाबी तपासण्यासाठी नुकताच ‘इ-मार्केटर’ या संस्थेने सर्वेक्षण केले. यात भारताच्या ग्रामीण भागात आजही कित्येक जण इंटरनेटबद्दल बोलताना ‘दुरुन डोंगर साजरे’ या पावित्र्यावर ठाम आहेत. शिवाय, या सर्वेक्षणात ग्रामीण ग्राहकवर्ग आजही इंटरनेटवर विश्वास नसल्याने आॅनलाईन शॉपिंगकडे वळत नसल्याचे दिसून आले आहे.
या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील नेटिझन्सना इंटरनेटचा वापर कसा करावा, हे सुद्धा माहित नसल्याने आॅनलाईन शॉपिंगचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून इ-कॉमर्स आणि शिक्षण हे दोन्ही घटक एकमेकांशी संलग्न असल्याचे दिसले आहे. तसेच, अनेक ग्राहकांना अजूनही आॅनलाईन सेवा हाताळण्यापूर्वी अथवा खरेदीपूर्वी सर्वप्रथम ‘आॅनलाईन’या शब्दाची आणि तंत्रज्ञानाची नीट माहिती करुन घेणे अत्यावश्यक आहे.
या सर्वेक्षणात असेही आढळून आले की, ग्रामीण भागातील जवळपास सर्वच वर्गातील एक तृतीयांश लोकसंख्या क्रेडिट - डेबिट कार्डचा वापर करत नाही, परिणामी ते आॅनलाईन सेवेचा वापर करुच शकत नाहीत.
ग्रामीण क्षेत्रातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्येकडून ‘कॅश’ अर्थात रोकड स्वरुपात पैशांची देवाणघेवाण करण्याला प्राधान्य देण्यात येते.
या सर्वेक्षणाद्वारे इंटरनेट आणि आॅनलाईन सेवा हाताळण्याबाबतचे प्रशिक्षण दिल्यास तसा प्रयत्न करु असे लोकसंख्येचे असे मत आहे. आॅनलाईन संदर्भात म्हणायचे झाले तर, काही वस्तू, सेवा न हाताळता त्याबाबत कोणतीही टिका करणे अपरिहार्य ठरते. इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी अनेकजण आजही इंटरनेटवरील संकेतस्थळांना भेट देतात, पण आॅनलाईन शॉपिंगला मात्र थोडेसे कचरतात. (प्रतिनिधी)
इंटरनेटवर विश्वास नाही 40%
इंटरनेट वापरता येत नाही 30%
संकेतस्थळ हाताळता येत नाही 10%
ँपैशांची असुरक्षित देवाणघेवाण 20%