वडघरचा भराव पनवेलसाठी आपत्ती
By Admin | Updated: June 11, 2015 22:50 IST2015-06-11T22:50:26+5:302015-06-11T22:50:26+5:30
पनवेल शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. शहरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वडघर गावात

वडघरचा भराव पनवेलसाठी आपत्ती
प्रशांत शेडगे, पनवेल
पनवेल शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. शहरात पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना करण्यात येत असल्या तरी वडघर गावात विमानतळबाधितांच्या पुनर्वसनाकरिता करण्यात आलेल्या भरावामुळे शहरावर आपत्ती ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे गाढी नदीकिनारच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पनवेल शहराच्या ५० किमीच्या हद्दीत बावन बंगला, साईनगर, कोळीवाडा, पटेल, कच्छी मोहल्ला, मिडलक्लास हाऊसिंग सोसायटी, कोळीवाडा, तक्का, ठाणा नाका, कफ नगर, खांदा गाव असे महत्त्वाची ठिकाणे येतात. पूर्वीचे वाडे, जुनी घरे तोडून त्याठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने शहराचा चेहरामोहराच बदलला आहे. त्याचा परिणाम आपत्ती व्यवस्थापनावरही होतआहे. शहरातील अनेक भागांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्याचा फटका २६ जुलै २००५ साली शहराला बसला. त्या घटनेचा बोध घेऊन पालिकेने जवळपास १७ ते १८ किमीचे पावसाळी नाले बांधले आहेत. या नाल्यांतील पाणी लगतच्या नदी, खाडीत सोडण्यात येते.
सिडकोने वडघर येथे विमानतळबाधितांच्या पुनर्वसनाकरिता मोठ्या प्रमाणात भराव केला आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यात अडचणी येणार असून हे पाणी शहरात घुसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषत: गाढी नदीलगत असलेला कोळीवाडा, त्याचबरोबर मुस्लीम मोहल्ल्यात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. या भरावाचा परिणाम पनवेलवर होण्याची शक्यता खार जमीन संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. के.डी. पाटील यांनी वर्तवली आहे.