Join us  

'नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचं नाव देण्याची मागणी अन् सिंधुदुर्गात शिवसेनेचाच विरोध'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 9:28 AM

चीपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. बॅ. नाथ पै हे मोठे नेते होतेच यात वाद नाही. पण, चिपी विमानतळाला शिवसेना खासदार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही.

ठळक मुद्देचीपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. त्यावरुनच राणेंनी खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.  बॅ. नाथ पै हे मोठे नेते होतेच यात वाद नाही

मुंबई - नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची भूमिपुत्रांची मागणी आहे. प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा विचार करून गरज पडल्यास तिन्ही पक्षांशी समन्वय साधून हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. तर, दुसरीकडे चीपी विमानतळाच्या नामकरणावरुनही वाद सुरू असल्याचे दिसून येते. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

चीपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. त्यावरुनच राणेंनी खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.  बॅ. नाथ पै हे मोठे नेते होतेच यात वाद नाही. पण, चिपी विमानतळाला शिवसेना खासदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला विरोध करणे यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. कोण नाव सुचवत आहे, यापेक्षा नाव देण्याची मागणी होत आहे, याचे स्वागत केले पाहिजे होते. पण, आता ती शिवसेना राहिली नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांच्या नावाची मागणी करायची आणि सिंधुदुर्गात विरोध करायचा, हेच आताच्या शिवसेनेचे घाणेरडे राजकारण असल्याचेही राणेंनी म्हटलंय. 

काय म्हणाले होते विनायक राऊत

चिपी विमानतळासंदर्भात आम्हाला कोणतेही श्रेय घेण्याचा प्रश्न नाही. अवघ्या 2500 रुपयांत सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास कोकणवासीयांना उपलब्ध होणार आहे, याचा आनंद असल्याचं पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं. चिपी विमानतळ कोणी सुरु केलं हे महत्त्वाचे नाही तर विमानतळ सुरू होऊन जिल्हावासीयांना विमानतळ सेवा मिळावी हा हेतू आहे. चिपी विमानतळाला चारही बाजूला रस्त्याची कनेक्टिव्हिटी केली आहे, असेही त्यांनी म्हटले.  

टॅग्स :नीतेश राणे शिवसेनानवी मुंबईविमानतळ