ओशिवऱ्यात दिग्दर्शकावर विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:06 IST2021-06-30T04:06:00+5:302021-06-30T04:06:00+5:30

मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून शोध सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एका २५ वर्षीय मॉडेलच्या विनयभंगासह तिची फसवणूक केल्याप्रकरणी दिग्दर्शक ...

Director accused of molestation, fraud in Oshiwara | ओशिवऱ्यात दिग्दर्शकावर विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा

ओशिवऱ्यात दिग्दर्शकावर विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा

मॉडेलच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एका २५ वर्षीय मॉडेलच्या विनयभंगासह तिची फसवणूक केल्याप्रकरणी दिग्दर्शक साहिल कपूर याच्यावर ओशिवरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पसार झाला असून, पाेलीस त्याचा शोध घेत आहेत.

मॉडेलच्या तक्रारीनुसार १९ जून रोजी कपूरने तिच्याकडून ५ लाख रुपये घेतले. तिचा व्हिडिओ अलबम तयार करण्याचे त्याने कबूल केले होते. तो तयार झाल्यानंतर त्याचे कॉपी राईट्स त्याने स्वतःकडे ठेवले. तो देण्यासाठी त्याने तिला भिवंडी येथे बोलावत तिचा विनयभंग केला. नंतर तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कपूरला फोन करत पैसे परत मागितले. तेव्हा कपूरने तिला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याची तक्रार तिने पोलिसांकडे केली. त्यानुसार कपूरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाेलीस त्याचा शोध घेत आहेत.

.......................................................

Web Title: Director accused of molestation, fraud in Oshiwara