Join us
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारा देणार मुंबई ते दोहा थेट सेवा; १५ डिसेंबरपासून होणार सुरुवात

By मनोज गडनीस | Updated: December 1, 2023 17:37 IST

५० व्या मार्गावर कंपनीची विमान सेवा जोडणी होणार आहे. 

मनोज गडनीस, मुंबई - येत्या १५ डिसेंबरपासून मुंबई ते दोहा (कतार) अशी थेट विमान सेवा सुरू करण्याची घोषणा विस्तारा कंपनीने केली आहे. दोहा येथील विमान सेवेच्या निमित्ताने ५० व्या मार्गावर कंपनीची विमान सेवा जोडणी होणार आहे. 

मुंबई ते दोहा या मार्गावर कंपनीची विमाने चार वेळा उड्डाण करणार आहेत. तसेच या करिता कंपनीच्या ताफ्यातील एअरबस कंपनीचे ए-३२१ निओ हे अद्ययावत विमान कंपनीने रुजू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोहा हे मध्यपूर्वेतील मोठे व्यापारउद्दीमाचे केंद्र मानले जाते. किंबहुना, मध्यपूर्वेतील देशांची राजधानी अशी याची अलिखित ओळख आहे. मुंबई ते दोहा या थेट विमानसेवेमुळे दोन्ही शहरांतील व्यापार-उद्दीमाला याचा मोठा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने कंपनीने व्यक्त केली आहे.

टॅग्स :विमानतळविमानकतारमुंबई