दिलीपकुमार यांना आज डिस्चार्ज

By Admin | Updated: April 21, 2016 04:30 IST2016-04-21T04:30:31+5:302016-04-21T04:30:31+5:30

मूत्रपिंड आणि फुप्फुसात संसर्ग झाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Dilipkumar discharged today | दिलीपकुमार यांना आज डिस्चार्ज

दिलीपकुमार यांना आज डिस्चार्ज

मुंबई : मूत्रपिंड आणि फुप्फुसात संसर्ग झाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीपकुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे गुरुवार, २१ एप्रिलला सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
१५ एप्रिलला दिलीपकुमार यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार दिवसांमध्ये दिलीपकुमार यांनी उपचारांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात येत असल्याचे डॉ. जलील परकार यांनी सांगितले. बुधवारी अभिनेता आमीर खान दिलीप कुमार यांना भेटायला लीलावती रुग्णालयात आले होते. फुप्फुस आणि मूत्रपिंडाचा संसर्ग कमी झाला असला, तरीही घरी गेल्यावर काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. त्याचबरोबर, त्यांना काही औषधे दिली जाणार आहेत, अशी माहिती डॉ. परकार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Dilipkumar discharged today