अभिनेते दिलीप कुमार यांना डिस्चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:50 IST2017-08-10T03:49:55+5:302017-08-10T03:50:01+5:30

बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी सायंकाळी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली.

Dilip Kumar discharged to actor | अभिनेते दिलीप कुमार यांना डिस्चार्ज  

अभिनेते दिलीप कुमार यांना डिस्चार्ज  

 मुंबई : बॉलीवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी सायंकाळी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली. तब्बल एका आठवड्यानंतर दिलीप कुमार यांना डिस्चार्ज दिल्याने, चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
दिलीप कुमार यांना गेल्या आठवड्यात रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. सायरा बानो यांनी सोशल मीडियावर अशी माहिती दिली की, दिलीप साहेबांवर डॉ. नितीन गोखले, डॉ. अरुण शाह, फॅमिली फिजिशिअन डॉ. अरुण शाह आणि डॉ. अरुण गोखले यांनी दिवसरात्र केलेल्या मेहनतीने आणि अल्लाहच्या कृपेने दिलीप साहेब सुखरूप आहेत. डॉक्टरांच्या परवानगीनंतर दिलीप साहेबांना घरी घेऊन जात आहोत. या वेळी त्यांच्या सर्व चाहत्यांचे, शुभचिंतकांचे, हॉस्पिटलमध्ये असताना दिलीप साहेबांची काळजी घेतलेल्या सर्व स्टाफचे मी मनापासून आभार मानते.

Web Title: Dilip Kumar discharged to actor