कपिल शर्मा फसवणूक प्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:43+5:302021-02-05T04:28:43+5:30
सीआययुची कारवाई कपील शर्मा फसवणूक प्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक सीआययूची कारवाई सुधारित बातमी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

कपिल शर्मा फसवणूक प्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक
सीआययुची कारवाई
कपील शर्मा फसवणूक प्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक
सीआययूची कारवाई
सुधारित बातमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हास्यकलाकार कपिल शर्मा ५ कोटी ३२ लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ड़ी.सी. डिझाइनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांची बहीण कांचन हरिकिशनदास छाब्रिया आणि निहाल बजाजला अटक केली आहे.
एकाच चेसिस आणि इंजिन नंबरची वेगवेगळ्या राज्यात अनेकदा नोंदणी, स्वतःच तयार केलेल्या कारवर कर्ज घेऊन स्वतः खरेदी करणे, तसेच एका वाहनावर अनेकदा कर्ज घेणे अशा प्रकारचा डीसी डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा घोटाळा पोलिसांनी डिसेंबरच्या अखेरीस उघडकीस आणला. कंपनीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करत छाब्रियाला १८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
हा तपास सुरू असतानाच व्हॅनिटी व्हॅन बनवून देतो, असे सांगून छाब्रिया यांनी ५ कोटी ३२ लाख रुपयांना फसविल्याची तक्रार कपिल शर्मा यांनी केली. त्यांच्या तक्ररीनंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. कपिलने दिलेल्या तक्रारीत, त्यांची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन नसल्याने भाड्याने घेतलेल्या व्हॅनसाठी त्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत होते. अशात त्यांनी सेलिब्रिटींकडे चौकशी केली. त्यादरम्यान त्यांना अभिनेता शाहरुख खानची व्हॅनिटी आवडली. त्यांनी शाहरुखकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी त्याची व्हॅनिटी छाब्रियाकडून करून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार २०१६ मध्ये त्यांनी छाब्रियाची भेट घेतली. छाब्रियाने ६ कोटी रुपयांचे कोटेशन दिले. पुढे ४ कोटी ५० लाख रुपयामध्ये व्यवहार ठरला.
पुढे पैसे नसल्याचे सांगत आणखीन पैसे उकळले. अशा प्रकारे कपिलने २०१७ मध्ये हप्त्यांमध्ये ५ कोटी ३१ लाख ९३ हजार दिले. याच प्रकरणात बुधवारी छाब्रियाची बहीण कांचन आणि डी.सी. डिझाइनचा सेल प्रमुख निहाल बजालला अटक केली आहे.
...