दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST2021-02-05T04:28:48+5:302021-02-05T04:28:48+5:30
सीआययुची कारवाई : डी. सी. अवंती कार घोटाळाप्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार अशी ...

दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक
सीआययुची कारवाई : डी. सी. अवंती कार घोटाळाप्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय बनावटीची पहिली स्पोर्ट्स कार अशी ओळख असलेल्या ‘डीसी अवंती’ कारच्या घोटाळाप्रकरणी बुधवारी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययु) दिलीप छाब्रियाच्या बहिणीला मरीन ड्राइव्ह येथून अटक केली. या घोटाळ्यात त्या पाहिजे आरोपी आहेत.
उत्पादक कंपनी असलेल्या दिलीप छाब्रिया डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ग्राहकांऐवजी स्वत:च कार विकत घेतल्या. त्यासाठी खासगी वित्त संस्थांकडे एकच कार तारण ठेवून कर्ज घेतले. विशेष म्हणजे एकाच इंजिन-चासी क्रमांकाच्या दोन किंवा त्याहून अधिक कारची नोंद विविध राज्यांत करून त्या विक्रीस काढल्या. यात १०० कोटींचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी कंपनीचे संस्थापक दिलीप छाब्रियाला १८ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
याच गुन्ह्यात छाब्रियाचा मुलगा बोनिटो, बहीण कांचनसह कंपनी संचालकाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यानुसार सीआययु आरोपीचा शोध घेत असताना, छाब्रियाची बहिण कांचन या मरीन ड्राइव्ह येथे आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार तिला अटक करण्यात आली.
* आणखी एक गुन्हा
छाब्रियाविरोधात हास्यकलाकार कपिल शर्मापाठोपाठ आणखी ६ तक्रारदार पुढे आले आहेत. कपिल शर्माची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात छाब्रियाला पुन्हा अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठ छाब्रियाविरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
......................
.....