Join us  

डिजीटल इंडियालाही कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 6:48 PM

एप्रिल महिन्यांतील व्यवहारांमध्ये ६० टक्के घट  

 

मुंबई : नोटबंदीनंतर केंद्र सरकारने डिजीटल इंडियाची हाळी दिली असली तरी त्यात अपेक्षित यश आलेले दिसत नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने देशात या व्यवहारांना चालना मिळत असली तरी २०१९ आणि २०२० सालातील जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीचा आढावा घेतल्यास डिजीटल व्यवहारांमध्ये १० टक्के घट झाली असून या माध्यमातून होणारी उलाढाल १२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, एप्रिल महिन्यांत हे व्यवहार ६० टक्क्यांनी कमी झाले आहे.

नाईट फ्रॅकने प्रसिध्द केलेल्या ‘वर्ल्डलाईन इंडिया डिजीटल पेमेंट’ रिपोर्टमधून हाती आली आहे. डिजीटल व्यवहारांमध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ कर्नाटक, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांचा क्रमांक आहे. शहरांमध्ये मात्र बंगळूरू आघाडीवर असून चेन्नईपाठोपाठ मुंबई आणि पुण्याचा क्रमांक लागतो. किराणा सामान, रेस्ट्राँरण्ट, पेट्रोल आणि कपडे खरेदीसाठी डिजीटल पेमेंटचा सर्वाधिक वापर होतो. पहिल्या तिमाहीत मोबाईल अँपच्या सहाय्याने झालेले व्यवहार ४२५ कोटी तर, नेट बँकिंगचे व्यवहार ८१ कोटी आहेत. जानेवारी ते मार्च, २०२० या तीन महिन्यांत देशात विविध बँकांनी ५० लाख नवे पीओएस (पाँईट आँफ सेल्स – जिथे आँनलाईन व्यवहार होतात अशी केंद्र) कार्यान्वीत केली आहेत. त्यात खासगी बँकांचा वाटा ६९ टक्के होता.

 

क्रेडिट वाढले ; डेबिट घटले

देशात मार्च, २०२० अखेरीपर्यंत ५ कोटी ७० लाख क्रेडिट कार्ड असून डेबिट कार्डची संख्या तब्बल ८२ कोटींवर झेपावली आहे. मात्र, २०१९ च्या तुलनेत क्रेडिट कार्डची संख्या २४ टक्क्यांनी वाढली असून डेबिट कार्डची संख्या ११ टक्क्यांनी घटली आहे. विशेष म्हणजे २ कोटी ३० लाख क्रेडिट कार्ड डिसेंबर, २०१९ नंतर देण्यात आलेले आहेत. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पहिल्या तिमाहीत १७९ कोटींचे व्यवहार झाले असून डेबिट कार्डची उलाढाल २३०० कोटींपर्यंत वाढली होती.    

 

व्हँलेंटाईन डेसाठी सर्वाधिक वापर

देशात डिजीटल पेमेंटचा सर्वाधिक वापर ९ फेब्रुवारी रोजी झाला. १४ एप्रिलच्या व्हँलेटाईन डेच्या आधीचा विकएण्ड होता. तसेच, सर्वाधिक व्यवहार जानेवारी महिन्यांत झाल्याचे हा अहवाल सांगतो.

 

 

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याडिजिटलमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस