मुलांना होतोय डिजिटल अॅम्नेशिया
By Admin | Updated: November 15, 2015 01:43 IST2015-11-15T01:43:09+5:302015-11-15T01:43:09+5:30
‘तीन वर्षांचा रोहन टॅब आॅपरेट करतो’, ‘पाच वर्षांची पिंकी स्मार्ट फोन युज करते’ अशा गोष्टी पालक अभिमानाने सांगतात. पण, प्रत्यक्षात इतक्या लहान वयात मुलांच्या हातात स्मार्ट फोन्स देणे

मुलांना होतोय डिजिटल अॅम्नेशिया
मुंबई : ‘तीन वर्षांचा रोहन टॅब आॅपरेट करतो’, ‘पाच वर्षांची पिंकी स्मार्ट फोन युज करते’ अशा गोष्टी पालक अभिमानाने सांगतात. पण, प्रत्यक्षात इतक्या लहान वयात मुलांच्या हातात स्मार्ट फोन्स देणे, इंटरनेटचा वापर करायला शिकवणे हे ‘स्मार्ट’पणाचे लक्षण नसून मुलांची प्रगती खुंटण्याचे कारण आहे. स्मार्ट फोन्स आणि इंटरनेटमुळे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात स्मार्ट फोन्स, टॅब वापरामुळे अनेकांची स्मृती कमी होत असल्याचे आढळून आले आहे. हे संशोधन अमेरिकेत झाले आहे. परंतु, देशातही अशीच परिस्थिती दिसत आहे. देशातही लहान मुले मोठ्या प्रमाणावर स्मार्ट फोन्स वापरतात. मुंबईतील जी.टी. रुग्णालयात ३ ते ४ मुलांवर सध्या डिजिटल अॅम्नेशियावर उपचार सुरू असल्याचे डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.
अनेक जण लहान मुलांना विरंगुळा म्हणून स्वत:चे स्मार्ट फोन्स खेळण्यासाठी देतात किंवा शाळेतून घरी येताना मुले एकटीच येतात. त्यांना काही निरोप द्यायचा असल्यास पटकन संपर्क साधता यावा, म्हणून पालकच लहान मुलांना स्मार्ट फोन्स देतात. पण, त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर होताना दिसत आहे. सतत स्मार्ट फोनचा वापर केल्यामुळे नैसर्गिकरीत्या मुलांची इतर गोष्टींत एकाग्रता कमी व्हायला लागते. या मुलांना स्मार्ट फोन दिला नाही, तर ते चिडचिडेपणा करायला लागतात, असे डॉ. मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शाळेत नेहमी पहिला नंबर येणाऱ्या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या दीड एक वर्षापासून हा मुलगा स्मार्ट फोन वापरायला लागला आहे. गेल्या दोन परीक्षांमध्ये त्याचे गुण कमी झाले आहेत.
त्यामुळे त्याच्या आईने उपचारासाठी आणले. या मुलांची स्मरणशक्ती कमी झाली आहे. ते अनेक
गोष्टींत एकाग्रचित्ताने काम करू शकत नाहीत. त्याला डिजिटल अॅम्नेशिया असे म्हणतात. तर इंटरनेटच्या वापरामुळे होणाऱ्या त्रासाला गुगल इफेक्ट असे म्हटले जाते.