पोस्टाच्या परीक्षा केंद्रांतील संगणकांत बिघाड
By Admin | Updated: January 30, 2017 04:07 IST2017-01-30T04:07:25+5:302017-01-30T04:07:25+5:30
पनवेलमध्ये तीन केंद्रांवर रविवारी पोस्टल असिस्टंट व सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यासाठी राज्यभरातून उमेदवारांनी हजेरी लावली होती.

पोस्टाच्या परीक्षा केंद्रांतील संगणकांत बिघाड
वैभव गायकर, पनवेल
पनवेलमध्ये तीन केंद्रांवर रविवारी पोस्टल असिस्टंट व सॉर्टिंग असिस्टंट पदासाठी परीक्षा घेण्यात आली. यासाठी राज्यभरातून उमेदवारांनी हजेरी लावली होती. मात्र, ऐन वेळी केंद्रावरील अनेक उमेदवारांचे संगणक हँग झाले. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या या परीक्षा देण्यासाठी, गोंदिया, नागपूर, शेगावसारख्या विविध भागांतील उमेदवार शनिवारी रात्रीच पनवेल येथे दाखल झाले होते. तीन केंद्रांपैकी कळंबोली एमजीएम या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना संगणक हँग झाल्याने परीक्षा देता आली नाही. २०१४ मध्ये झालेल्या परीक्षांवर न्यायालयात स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे ही परीक्षा आता २०१७ मध्ये घेण्यात आली. मात्र, या वेळीही तांत्रिक अडचणी आल्याने उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. पनवेलमध्ये एमजीएम कॉलेज, पिल्लई कॉलेज, तसेच भारती विद्यापीठ, खारघर या ठिकाणच्या केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षांसाठी ६००० उमेदवार पात्र ठरले होते. या उमेदवारांपैकी जवळजवळ ४००० ते ४५०० उमेदवार राज्यातील विविध भागांतून पनवेलमध्ये दाखल झाले होते. एका बॅचमध्ये २०० ते २५० उमेदवारांचा सहभाग होता. सकाळी ९ वाजल्यापासून ते १०.३० या वेळेत
डेटा एंट्री, टायपिंग टेस्ट आदी परीक्षा होणार होत्या. मात्र, परीक्षा सुरू असताना अचानक संगणकांत
बिघाड झाल्याने परीक्षेसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी तक्र ार परीक्षार्थी म्हणून शेगाववरून आलेल्या प्रशांत तायडे यांनी केली. या संदर्भात पर्यवेक्षकाकडे तक्रार करूनदेखील दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)