अनाथांसाठी आता स्पर्धा परीक्षांत वेगळा प्रवर्ग -  देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 01:06 AM2018-01-11T01:06:31+5:302018-01-11T01:06:38+5:30

राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणा-या अनाथ विद्यार्थ्यांना जातीजमातींसाठी राखीव असलेल्या प्रवगार्साठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. म्हणून अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

Different category for competition for the orphans - Devendra Fadnavis | अनाथांसाठी आता स्पर्धा परीक्षांत वेगळा प्रवर्ग -  देवेंद्र फडणवीस

अनाथांसाठी आता स्पर्धा परीक्षांत वेगळा प्रवर्ग -  देवेंद्र फडणवीस

Next

मुंबई : राज्य शासनाच्या स्पर्धा परीक्षा देणा-या अनाथ विद्यार्थ्यांना जातीजमातींसाठी राखीव असलेल्या प्रवगार्साठीच्या आरक्षणाचा लाभ
होत नाही. म्हणून अनाथ विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाºया एक विद्यार्थिनीने नुकतीच माझी भेट घेऊन तिची समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात आली असून, या माध्यमातून पुरोगामी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा निर्णय घेण्यात येणार आहे.

‘समाजमाध्यमांचे आव्हान परतवून लावा’
समाजमाध्यमांच्या गैरवापरामुळे अनेकद चुकीच्या व चिथावणीखोर माहितीसाठी गैरवापर केला
जात आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि लोकशाहीच्या सर्व स्तंभांनी या नवमाध्यमांचे आव्हान परतवून लावावे, असे आवाहन राज्यपाल सी.विद्यासागर राव
यांनी यावेळी केले.

Web Title: Different category for competition for the orphans - Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.