Join us  

संजय दत्तच्या बायोपिक ट्रेलरमध्ये दिसला 'सर्किट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 2:44 PM

बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे.

मुंबई - बॉलिवूडचा रॉकस्टार रणबीर कपूर स्टारर 'संजू' सिनेमाचं पोस्टर, टीझरनंतर दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'संजू' सिनेमा हा बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा बायोपिक आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट दिवसांमध्ये त्याला आलेला अनुभव मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सिनेमामध्ये संजू आपल्या बिनधास्त स्वभावानं आपल्या आयुष्याची कहाणी सर्वांसमोर मांडताना दिसत आहे.  

सिनेमाचा टीझर लाँच केल्यानंतर सिनेरसिक आतुरतेनं ट्रेलरची वाट पाहत होते. सिनेमामध्ये रणबीर कपूर हुबेहुब संजय दत्तप्रमाणेच दिसत आहे. त्यामुळे आता ट्रेलरनंतर सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. मात्र 'संजू' सिनेमा पाहण्यासाठी त्यांना 29 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'संजू'च्या ट्रेलरमध्ये सुरुवातीला संजय दत्त येरवडा कारागृहातून बाहेर येताना दिसत आहेत. संजय दत्तची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणारा रणबीर कपूर आयुष्यात झालेल्या चांगले-वाईट अनुभव सांगत आहे. ट्रेलरमध्ये अनुष्का शर्मादेखील दिसत आहे. पत्नीशिवाय तुमचे किती जणींसोबत शारीरिक संबंध होते? यावर संजय दत्तनं 350 जणींसोबत संबंध होते, असे उत्तर दिलं. 

ट्रेलरमध्ये संजय दत्तचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याची झलकदेखील दाखवण्यात आली आहे. विशेष म्हणजे संजय दत्तच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' सिनेमातील दृश्यदेखील ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत. यामध्ये चांगल्या वाईट दिवसांमध्ये मुन्नाभाईची साथ कायम देणारा सर्किटदेखील ट्रेलरमध्ये दिसत आहे. 

सिनेमामध्ये संजय दत्तची आई नर्गिसच्या भूमिकेत मनिषा कोईराला, वडील सुनील दत्तच्या भूमिकेत परेश रावल दिसत आहेत. तर विकी कौशल संजय दत्तच्या खास मित्राच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर अनुष्का शर्मा, करिश्मा तन्ना, जिम सरभ हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. 

 

टॅग्स :संजय दत्तरणबीर कपूरसंजू चित्रपट 2018