Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाखमोलाच्या घरांसाठी अर्ज केला का? म्हाडाच्या पहाडी गोरेगाव येथील घरे ऑन डिमांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 13:42 IST

MHADA Home: म्हाडाच्या लॉटरीमधील पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजारांवर आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत, तर लॉटरीमधील इतर ठिकाणी अत्यल्प गटासाठी राखीव असलेल्या घरांसाठीही सर्वाधिक अर्जदारांचे अर्ज येण्याची शक्यता असून, या घरांची किंमत २९ लाखांपासून ५० लाखांवर आहे. पहाडी गोरेगाव येथील घरांना जास्त मागणी असून, यापूर्वीही या घरांकडे अर्जदारांचे अधिक लक्ष होते.

मुंबई -  म्हाडाच्या लॉटरीमधील पहाडी गोरेगाव येथे असलेल्या अत्यल्प गटातील घरांची किंमत ३२ लाख ३६ हजारांवर आहे. ही घरे प्रधानमंत्री आवास योजनेमधील आहेत, तर लॉटरीमधील इतर ठिकाणी अत्यल्प गटासाठी राखीव असलेल्या घरांसाठीही सर्वाधिक अर्जदारांचे अर्ज येण्याची शक्यता असून, या घरांची किंमत २९ लाखांपासून ५० लाखांवर आहे. पहाडी गोरेगाव येथील घरांना जास्त मागणी असून, यापूर्वीही या घरांकडे अर्जदारांचे अधिक लक्ष होते.

म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृती प्रक्रियेला ३० मार्च रोजी ‘गो लाइव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ करण्यात आला होता. ९ एप्रिलपर्यंत १२,६५४ अर्ज आले असून, यापैकी ६,५१५ अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे.

अर्जदारांची पात्रता सोडतीच्या आधीच निश्चित होणार असून, या प्रणालीने पात्र ठरविलेले अर्जदारच सोडतीत सहभाग घेऊ शकतील. सोडतीअंतर्गत एकूण ९७ विविध ठिकाणी गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश आहे.

साेडतीतील अत्यल्प गटातील घरांची किंमतविक्रोळी    ४९ लाख पहाडी गोरेगाव    ३२ लाख ३६ हजारवडाळा    ४१ लाख ५१ हजार विक्रोळी    ३५ ते ३८ लाख मानखुर्द     २९ लाख ३७ हजार चांदिवली    २६ लाख ७० हजार

English
हिंदी सारांश
Web Title : MHADA Goregaon Housing: Apply Now for Affordable Homes On-Demand!

Web Summary : MHADA offers affordable homes in Pahadi Goregaon, priced at ₹32.36 lakhs under the Pradhan Mantri Awas Yojana. High demand is expected. Online applications are open, with over 12,654 applications received and 6,515 applicants paying deposits. Eligibility will be pre-determined for the lottery, including homes in Vikhroli, Wadala, and Chandivali.
टॅग्स :म्हाडा लॉटरीमुंबई