विक्रोळीत तरुणीची निर्घृण हत्या
By Admin | Updated: August 9, 2014 02:45 IST2014-08-09T02:45:01+5:302014-08-09T02:45:01+5:30
लग्नास नकार दिल्याच्या रागाने एकतर्फी प्रेमातून एका 18वर्षीय तरुणीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केल्याची घटना विक्रोळी येथे घडली.

विक्रोळीत तरुणीची निर्घृण हत्या
>मुंबई : लग्नास नकार दिल्याच्या रागाने एकतर्फी प्रेमातून एका 18वर्षीय तरुणीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केल्याची घटना विक्रोळी येथे घडली. पळ काढलेल्या हारुन नदिम शेख (23) याला विक्रोळी पोलिसांनी काही वेळातच अटक केली.
अफसाना मोहम्मद मुमताज चौधरी (18) असे मृत तरुणीचे नाव असून, ती टागोरनगर क्रमांक 2 येथे आईवडील आणि दोन भावंडांसोबत राहण्यास होती. आज सकाळी पावणोआठच्या सुमारास अफसाना सार्वजनिक शौचालयात नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्याचदरम्यान हारुन शौचालयाबाहेरच थांबला. अफसाना बाहेर येताच पिशवीतून आणलेला चाकू बाहेर काढत त्याने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली. तसेच, ‘तु मेरी नही हो सकती तो, और किसी की भी नही हो सकती,’ असे म्हणत त्याने हे वार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी विमल धोत्रे या महिलेने ‘लोकमत’शी बोलताना दिली. तिच्यावर आठ वार केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा होत असल्याचे पाहून हारुनने पळ काढला.
त्याचदरम्यान तेथून जात असलेल्या रिक्षाचालकाने हारुनचा पाठलाग केला. त्यापाठोपाठ रात्रपाळीवरून घरी चाललेले पोलीसनाईक बाळकृष्ण नांदवडेकर यांनीही त्याला वाटेत अडवत त्याला ताब्यात घेतले. दुसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात बचावासाठी विनवणी करणा:या अफसानाला स्थानिक रहिवाशांनी तत्काळ जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र तिच्या शरीरावरील खोलवर जखमा पाहून तिला राजावाडी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अफसानाच्या राहत्या घराशेजारी असलेल्या अंडेविक्रीच्या दुकानात हारुन काम करत होता. ब:याच दिवसांपासून त्याचे अफसानावर एकतर्फी प्रेम होते. एवढेच नाहीतर हारुनने दीड महिन्यापूर्वी तिच्या घरी जाऊन अफसानाला लग्नाची मागणीही घातली. मात्र तिने आणि तिच्या घरच्यांनी हारुनची लग्नाची मागणी फेटाळून लावली. त्याच रागाने त्याने ही हत्या केली असल्याची माहिती विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक दिनेश देसाई यांनी दिली. गुन्ह्यात वापरलेला चाकू हस्तगत केला असून, तपास सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले. हारुन हा गोवंडी येथील पी.एल. लोखंडे मार्ग येथे राहण्यास आहे. 2क्क्8पासून तो टागोरनगरमध्ये अंडेविक्रीच्या दुकानात काम करत होता. (प्रतिनिधी)