Join us

हिरे व्यापारी हत्या: देबोलीना, सचिन पवारची एकत्रित चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 05:47 IST

महिला व्यवस्थापकावरही संशय, सातव्या आरोपीची रवानगी कोठडीत

मुंबई : हिरे व्यापारी राजेश्वर उदानी (५७) यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी अभिनेत्री देबोलीना भट्टाचार्या, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवार यांची एकत्रित चौकशी झाली. उदानी यांच्या कंपनीतील महिला व्यवस्थापकाकडेही चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवी अटक होण्याची शक्यता आहे.पैशांच्या देवाण-घेवाणीबरोबरच पवार हा उदानी भट्टाचार्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. अशा अभिनेत्री पैशांसाठी कुणासोबतही शारीरिक संबंध ठेवतात, असेही उदानी यांनी म्हटले होते. याचाच राग आल्याने सचिनने त्यांचा काटा काढला का? शिवाय उदानी यांच्या हत्येनंतर आणखी कुणाला फायदा होणार होता का? या दिशेने तपास सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी उदानी यांच्या महिला व्यवस्थापकाचीही चौकशी करण्यात आली. या महिलेला उदानी यांनी सात बंगला परिसरात घर घेऊन दिले. ती २० वर्षांपासून त्यांच्याकडे नोकरीला आहे. त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे चौकशीत समोर आल्याचे समजते.दरम्यान, गुरुवारी भट्टाचार्या, पवारची एकत्र चौकशी झाली. त्यांच्याकडून हत्येच्या घटनाक्रमाची माहिती घेतली जात आहे. भट्टाचार्याचा यात कितपत सहभाग आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. उदानी यांच्या हत्येमागे पवारच मुख्य सूत्रधार असून त्याने हा कट रचला. त्यात सुरुवातीला बारबाला निखत उर्फ झारा मोहम्मद खान(२०) हिला ४० हजार रुपये दिले होते. तसेच घटनेच्या दिवशी बैठक झाल्यानंतर सचिननेच ऐरोलीतून केक खरेदी केला; आणि तो झारासह गाडीत दिला. पुढे हत्येनंतर अलिबागला राहिलेल्या दिनेशला परत येण्यासाठी सचिननेच इनोवाची व्यवस्था केली. त्याच्याकडे तपास सुरू आहे. शुक्रवारी सचिनला न्यायालयात हजर करण्यात येईल. तर, सातवा अटक आरोपी सिद्धेश पाटीलला गुरुवारी १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली.अलिबाग, अंधेरी, ग्रॅण्ट रोडमध्ये तपास सुरुनिलंबित पोलीस दिनेश कदम याने हत्येनंतर अलिबागमध्ये मोबाइल जाळून त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती उघड झाली. त्यानुसार, तपास पथक अलिबागला रवाना झाले. तर हत्येसाठी वापरण्यात आलेले हॅण्डग्लोज त्यांनी गॅ्रण्ट रोड येथून खरेदी केल्याचे समोर येताच एक पथक तेथे रवाना झाले. हत्येसाठी वापरलेल्या आय टेन कारबाबतच्या अधिक तपासासाठी तपास पथक अंधेरीत तपास करत आहे.

टॅग्स :खूनमुंबई