Join us

डायलिसिस केंद्र  उपनगरातील रुग्णांसाठी ठरतेय आधारवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:53 IST

लॉकडाउनच्या 28व्या दिवशीसुद्धा उपनगरातील डायलिलीस रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबईतील अनेक डायलिसीस केंद्र  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाल्याने बंद झाल्याने तेथील रुग्णांची अवस्था गंभीर झाली आहे. मात्र उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आजही लॉकडाऊन च्या 28 व्या दिवशी देखिल गोरेगाव (पूर्व) येथील प्रबोधन धर्मादाय डायलिसिस केंद्र लॉकडाउनच्या 28व्या दिवशीसुद्धा उपनगरातील डायलिलीस रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाने 4 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सध्या या केंद्रात 70  डायलिसिस रुग्ण फक्त  250 रुपयांमध्ये सेवेचा लाभ घेत आहेत.कोरोनामुळे उदभववलेल्या आणीबाणीच्या  परिस्थितीत डायलिसिस पेशंटसाठी केंद्र सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे.सकाळी 8 ते रात्री 8 सदर केंद्र सुरु असून यात डॉकटर्स,टेक्नीशीअन व इतर मिळून 16 लोक काम करतात.प्रत्येक डायलिसिसची प्रक्रिया ही 4 तास चालते इतका वेळ पेशंट संपर्कात असतात अशा गंभीर परिस्थितीतही केंद्र सुरू ठेवण्याचा निर्धार केला.यातील काही टेक्नीशीअन लांब राहत असल्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी त्यांची सोय जवळील हॉटेलात केली असून ते येथेच राहून सेवा देत आहेत.

गोरेगावात डायलिसीस केंद्र हा उपक्रम सुरू करण्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मनात आल्यापासून गेली 4 वर्षे सदर प्रकल्प समर्थपणे चालवण्याचे कार्य अथक परिश्रम घेवून प्रकल्प प्रमुख व प्रबोधन गोरेगाव संस्थेचे प्रमुख कार्यवाह म्हणून सुनील वेलणकर पार पाडत आहेत. येथे पीपीई किट,सॅनिटायझर, मास्क व अन्य येथे कोणत्याही गोष्टीची कमतरता आम्ही रुग्ण व टेक्नीशीअन यांना पडू देत नाही.या सर्व प्रयत्नांत डॉ राजेश कुमार, डॉ वीरेंद्र गुप्ता, पूनम, शुक्ला आणि प्रबोधन कार्यकारिणी या सर्वांच्या सहकार्या शिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्यच नाही, अर्थात अजून ही लढाई संपली नाही ही अशीच चालू राहील. अशी माहिती वेलणकर यांनी दिली.

अनेक डायलिसीस केंद्र बंद झाल्याने तेथील रुग्णांची अवस्था खुप कठीण झाली आहे, विजया पवार यांचा फोन आला त्यांचे पती अशोक पवार यांना 4 दिवसा पासून डायलिसीस मिळाले नाही,त्यामुळे त्यांना असह्य वेदना होत आहेत, काही तरी करा आणि डायलिसीस करा, खर तर कोणीही नवीन पेशंट  डायलिसीस साठी घेण्यास अजिबात तयार नव्हते, पण आमच्या  डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्यांना जवळच्याच डायलिसीस केंद्रात डायलिसीसची व्यवस्था केली.आणि त्या डायलिसिस रुग्णाने फोन करून सांगितले की,आज डायलिसीसची सोय करून तुम्ही आज माझी मोठ्या त्रासातून सुटका केल्याबद्दल आभार मानले अशी माहिती वेलणकर यांनी दिली.

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्यामुंबईकोरोना वायरस बातम्या