साथीच्या रोगांचा विळखा
By Admin | Updated: August 13, 2014 00:14 IST2014-08-13T00:14:47+5:302014-08-13T00:14:47+5:30
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, भार्इंदर या महानगरांत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे़ मलेरियाने थैमान घातले आहे़

साथीच्या रोगांचा विळखा
ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, भार्इंदर या महानगरांत साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे़ मलेरियाने थैमान घातले आहे़ डेंग्यूसदृश आजाराचे तर लोकप्रतिनिधींच्या घरातच बळी गेले आहेत़ मात्र, तरीही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या प्रशासनाने पावसाळी आजारांची कोणतीही साथ नसल्याचा दावा करून आपले अपयश झाकण्याचा गुपचूप गुपचूप प्रयत्न केला आहे़
डेंग्यू-मलेरियापासून नगरसेवकाच्या पत्नीच्या मृत्यूनंतर ठाणे महापालिका हद्दीत मलेरिया आणि डेंग्यूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मागील सहा महिन्यांत शहरात मलेरियाचे ६८७, तर डेंग्यूचे २३ रुग्ण आढळले. तसेच साथरोग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
आरोग्य विभागामार्फत दरवर्षी साथरोग आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु तरीही मलेरिया आणि कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टो, टायफाइड, डेंग्यूसारखे आजार हे वाढतच असताना दिसत आहेत. वागळे इस्टेट भागात नगरसेवक दशरथ पालांंडे यांच्या पत्नी सारिका पालांडे यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्यानंतर साथरोगाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़