मुंबईत काेराेनाच्या नव्या ६४६ रुग्णांचे निदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST2020-12-02T04:04:49+5:302020-12-02T04:04:49+5:30
मुंबई : मुंबईत मंगळवारी ६४६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी बाधितांची एकूण संख्या २ ...

मुंबईत काेराेनाच्या नव्या ६४६ रुग्णांचे निदान
मुंबई : मुंबईत मंगळवारी ६४६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १९ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी बाधितांची एकूण संख्या २ लाख ८३ हजार ४६० झाली असून मृतांचा आकडा १० हजार ८१० एवढा आहे. सध्या १५,४७३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी २०७ दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या १८ लाख ९६ हजार २५५ चाचण्या करण्यात आल्या आहेत.