छोटय़ा दोस्तांना मधुमेह होण्याचे प्रमाण बळावले
By Admin | Updated: November 15, 2014 01:41 IST2014-11-15T01:41:23+5:302014-11-15T01:41:23+5:30
आई-बाबांकडे हट्ट केल्यावर मुलांना सगळ्या गोष्टी आजकाल सहज मिळतात. मुलांचे लाड करताना पालक मुलांना हवे असलेले पदार्थ खायला देत असल्यामुळे मुलांचे वजन वाढत जाते.

छोटय़ा दोस्तांना मधुमेह होण्याचे प्रमाण बळावले
मुंबई : आई-बाबांकडे हट्ट केल्यावर मुलांना सगळ्या गोष्टी आजकाल सहज मिळतात. मुलांचे लाड करताना पालक मुलांना हवे असलेले पदार्थ खायला देत असल्यामुळे मुलांचे वजन वाढत जाते. लहान मुले बारीक चांगली दिसत नाहीत, थोडी तरी गब्बू असावीत, असा पालकांचा समज रूढ होत आहे. त्यामुळे लहानपणी मुले स्थूल असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या दुर्लक्षामुळे लहान मुलांना टाइप 2 मधुमेह आणि पूर्वावस्थेतला मधुमेह होण्याचा धोका बळावतो. आगामी पाच वर्षात लहान मुलांमध्ये मधुमेह होण्याच्या प्रमाणात दुप्पट वाढ होण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
भारतामध्ये आजच्या घडीला सुमारे 25 ते 3क् टक्के लहान मुले ही स्थूल आहेत. स्थूल असणा:या मुलांमध्ये टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. स्थूल मुलांपैकी सध्या 15 ते 2क् टक्के मुलांना मधुमेहाची लागण झाल्याचे आढळून येते. मात्र अजूनही या विषयाकडे पालक आणि समाज गांभीर्याने पाहत नाही. लहान मुलांच्या जीवनशैलीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल केले नाहीत, तर हे प्रमाण पुढील 5 वर्षात दुप्पट म्हणजे 4क् टक्क्यांवर पोहोचण्याचा धोका असल्याचे केईएम रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. व्यंकटेश शिवणो यांनी सांगितले.
भारतामध्ये लहान मुलांना मधुमेह होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. लहान मुलांना गोड, तेलकट, तूपकट याचबरोबरीने आजकाल पिङझा, बर्गर, चीप्स असे पाश्चात्त्य पदार्थही सर्रास खायला दिले जातात. याचा परिणाम म्हणजे
मुलांचे वजन वाढायला सुरुवात होते. यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला नाही तर स्थूलता अधिकच वाढते.
हल्लीच्या लहान मुलांची जीवनशैली पूर्णपणो बदललेली आहे. मुलांचा दैनंदिन कार्यक्रम हा शाळा, घर, टय़ूशन इतकाच राहिलेला आहे. मुलांना खेळण्यासाठी शाळेत अथवा घराच्या आजूबाजूला मैदानेच उरलेली नाहीत. मुले शाळेत बसून असतात. घरी आल्यावर टीव्ही, कॉम्प्युटरसमोर बसतात. अथवा टॅब, मोबाइल घेऊन खेळत बसतात. दोघेही पालक नोकरी करत असल्यामुळे मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही.
यामुळे मुलांना गुंतवण्यासाठी त्यांना खाऊ आणि नवीन गॅङोट्स आणून दिली जातात. यामुळे मुलांचे वजन वाढण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे निरीक्षण डॉ. शिवणो यांनी नोंदविले आहे. शाळांमध्ये लहान मुलांना मैदानी खेळ खेळायला दिले पाहिजेत. जास्त वेळ मुले ही शाळेतच असतात. यामुळे शाळांमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी अधिक घेतली पाहिजे. दर महिन्याला मुलांच्या आरोग्याची तपासणी व्हायला पाहिजे. स्थूल मुलांचे वजन कमी करण्यासाठी काही उपक्रम शाळांमध्येदेखील राबविले पाहिजेत.
मधुमेह हा आजार प्रौढांना होणारा आजार आहे, यामुळे लहान मुले लठ्ठ असली तरी त्यांना होणार नाही हा मोठा गैरसमज आहे. मुलांमध्ये स्थूलता असल्यास ती कमी करण्यासाठी त्यांनी व्यायाम केला पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे. याचबरोबरीने पालकांनी मुलांवर अभ्यास, स्पर्धा यांचा ताण टाकू नये. मुलांवर ताण असेल तर मुले जास्त खातात आणि यामुळेही स्थूलता वाढते. मुलांची स्थूलता कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. ज्या मुलांबरोबर पालकही या उपक्रमांमध्ये सहभागी होतात तिथे मुलांमध्ये चांगल्या प्रकारे बदल झालेला दिसून येतो.
सध्याच्या पिढीला जंक फूड खाणो जास्त आवडते. मुले ही पालकांचे अनुकरण करत असतात. यामुळे लहान मुलेही याच प्रकारचे अन्न खाण्यास पसंती देतात. जेवणामध्ये मेदयुक्त (फॅट), कबरेदके (कार्बाेहायड्रेट्स) यांचे प्रमाण कमी ठेवून प्रथिने (प्रोटीन), तंतूमय पदार्थ (फायबर) यांचे प्रमाण अधिक ठेवणो गरजेचे आहे. सगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, हिरव्या पालेभाज्या, सलाड, ताजी फळे आहारामध्ये असावा. सर्रासपणो तळलेले पदार्थ, मैद्याचे पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. खाण्यातून मैदा व्यर्ज केला पाहिजे. याचबरोबरीने शीतपेय, हवाबंद पदार्थ, पॅक्ड फूड मुलांना देणो टाळले पाहिजे.