डबेवाल्यांचा आरोग्यविषयक प्रस्ताव ‘धूळखात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 02:11 AM2017-11-23T02:11:18+5:302017-11-23T02:11:28+5:30

मुंबई महापालिकेच्या सभागृहात डबेवाल्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ठराव झाला होता.

'Dhulkhaat' for healthcare professionals | डबेवाल्यांचा आरोग्यविषयक प्रस्ताव ‘धूळखात’

डबेवाल्यांचा आरोग्यविषयक प्रस्ताव ‘धूळखात’

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहात डबेवाल्यांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी अडीच वर्षांपूर्वी ठराव झाला होता. त्या वेळेस डबेवाल्यांसाठी रुग्णालयांत राखीव विशेष कक्ष असावा, असे तत्कालीन पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी मंजूर केले होते. मात्र या ठरावाला बराच काळ उलटूनही तो कागदावरच ‘धूळखात’ पडल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा डबेवाल्यांना विशेष आरोग्यसेवा पुरवाव्यात, याकरिता डबेवाले महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना साकडे घालणार आहेत.
मुंबईच्या डबेवाल्यांना पालिका कर्मचाºयांप्रमाणे रुग्णालयांतील सेवेचा लाभ मिळण्यासाठी विशेष ओळखपत्राची मागणी केली आहे. त्यामुळे डबेवाल्यांनी पुन्हा हा प्रस्ताव पालिका प्रशासनापर्यंत पोहोचावा यासाठी पुढाकार घेतला आहे. डबेवाल्यांना महानगरपालिकेच्या रुग्णालयांत विशेष कक्ष स्थापन करून आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यास काही अडचणी असतील तर त्याविषयी चर्चा करण्यास तयारी असल्याचे मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Web Title: 'Dhulkhaat' for healthcare professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.