Join us
Daily Top 2Weekly Top 5

दादरमध्ये गोवा फेस्टिव्हलची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 02:09 IST

दादरच्या डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूलमध्ये १० व ११ फेब्रुवारी रोजी ‘गोवा फेस्टिव्हल’ची धूम असणार आहे. यंदा फेस्टिव्हलचे आठवे वर्ष असून गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगारनिर्मितीसाठी व तेथील वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी; या हेतूने ‘आम्ही गोयंकार’ या संस्थेने या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.

मुंबई : दादरच्या डॉ. अँटोनियो डिसिल्वा टेक्निकल हायस्कूलमध्ये १० व ११ फेब्रुवारी रोजी ‘गोवा फेस्टिव्हल’ची धूम असणार आहे. यंदा फेस्टिव्हलचे आठवे वर्ष असून गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगारनिर्मितीसाठी व तेथील वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी; या हेतूने ‘आम्ही गोयंकार’ या संस्थेने या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये विविध स्पर्धा, चर्चासत्र, संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम पार पडणार असून सर्व रसिकांना महोत्सवात नि:शुल्क प्रवेश राहणार आहे. कोंकणी बोलण्याची स्पर्धा, कोंकणी साहित्याचे उगडास, गजाली आणि गीता यांसारख्या कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. महोत्सवाच्या दुसºया दिवशी गुटगुटीत बालकांची स्पर्धा, पाकस्पर्धा, टॅलेन्ट स्पर्धा, संगीत कार्यक्रम या वेळी घेण्यात येतील.

टॅग्स :मुंबईशाळा