मुंबईसह देशभरात धुळवड साजरी

By Admin | Updated: March 7, 2015 02:07 IST2015-03-07T02:07:19+5:302015-03-07T02:07:19+5:30

गुरुवारी संध्याकाळी होळी पेटविल्यानंतर मुंबई आणि उत्तर भारतामध्ये सर्वत्र उत्साहात धूलिवंदन साजरे केले गेले.

Dholwad celebrated across the country including Mumbai | मुंबईसह देशभरात धुळवड साजरी

मुंबईसह देशभरात धुळवड साजरी

जल्लोष : गाण्यांच्या तालावर थिरकली तरुणाई
मुंबई : गुरुवारी संध्याकाळी होळी पेटविल्यानंतर मुंबई आणि उत्तर भारतामध्ये सर्वत्र उत्साहात धूलिवंदन साजरे केले गेले. देशभरामध्ये अनेक ठिकाणी ढोलवाद्यांच्या आणि गाण्यांच्या तालावर थिरकत, मिठाईने तोंड गोड करून आणि एकमेकांना रंग फासत हा रंगांचा सण साजरा करण्यात आला.
उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीमध्ये हा सण विशेष उत्साहात साजरा केला गेला. विविध पक्षांचे राजकीय नेते आणि बॉलिवूडमधील कलाकारांनीही धुळवडीचा दिवस रंग खेळून जोरदार साजरा केला. मुंबईमध्येही तरुणांनी आणि सर्वच आबालवृद्धांनी रंग खेळण्याचा आनंद लुटला. स्वाइन फ्लूचा होणारा संसर्ग आणि अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान यामुळे काळजी घेण्याचे आणि कोरडी होळी खेळण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे करण्यात येत होते. काही घटना वगळता मुंबईसह सर्वत्र होळीचा सण शांततेत पार पडला.

धुळवडीनंतर खडवली येथील भातसाच्या पिकनिक पॉइंटवर आंघोळीसाठी आलेल्या रमेश नडमित्तला (२७) व नरेश नडमित्तला (२५) या दोघांचा मृत्यू झाला. ते चुलत भाऊ असून, भिवंडी येथील रहिवासी होते.

Web Title: Dholwad celebrated across the country including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.