पोलीस ठाण्याबाहेर आरोपीचा धिंगाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:06 IST2021-05-01T04:06:20+5:302021-05-01T04:06:20+5:30

पोलीस वाहनांची तोड़फोड़ पोलीस ठाण्याबाहेर आरोपीचा धिंगाणा पोलिसांच्या वाहनांची तोडफाेड लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या ...

Dhingana of the accused outside the police station | पोलीस ठाण्याबाहेर आरोपीचा धिंगाणा

पोलीस ठाण्याबाहेर आरोपीचा धिंगाणा

पोलीस वाहनांची तोड़फोड़

पोलीस ठाण्याबाहेर आरोपीचा धिंगाणा

पोलिसांच्या वाहनांची तोडफाेड

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या अभिलेखावरील आरोपीने गुरुवारी पोलिसांना शिवीगाळ करत त्यांच्या दोन वाहनांची तोडफाेड केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी त्याला अटक केली. गजल सौरप्पा लोटी असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर तडीपारीचीही कारवाई करण्यात आली आहे.

गजल हा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास असून गुरुवारी तो मद्यधुंद अवस्थेत घरी गेला. तेथे तो वाद घालत असल्याची माहिती मिळताच, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या दोन वाहनांची जवळील पेव्हर ब्लॉकने तोडफाेड केली. पोलीस ठाण्यात आणताच तेथेही त्याचा धिंगाणा सुरू होता. अखेर, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा तसेच विविध कलमान्वये गुन्हा नोंदवत, त्याला अटक केली.

........................

Web Title: Dhingana of the accused outside the police station