खासदार वनगांनी घेतले धानोशी दत्तक
By Admin | Updated: November 30, 2014 22:52 IST2014-11-30T22:52:37+5:302014-11-30T22:52:37+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेनुसार खा. अॅड. चिंतामण वनगा यांनी तालुक्यातील धानोशी गाव दत्तक घेतले असून

खासदार वनगांनी घेतले धानोशी दत्तक
विक्रमगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेनुसार खा. अॅड. चिंतामण वनगा यांनी तालुक्यातील धानोशी गाव दत्तक घेतले असून या गावाचा विकास घडवून ते आदर्श गाव बनविण्यात खासदारांचा पुढाकार असणार आहे.
या गावातील पाणी, आरोग्य, वीज या मूलभूत गरजांना विशेष प्राधान्य असणार असून पंतप्रधानांच्या संकल्पनेतून ही दत्तक गाव योजना साकार होत असल्याचे सांगितले.
ग्रामीण भागात तळागाळातील माणसांपर्यंत योजनेचा लाभ दिला जाईल आणि त्यांच्या समस्या सोडविल्या जातील. येणाऱ्या काळात हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, यासाठी विशेष परिश्रम घेतले जाणार असल्याचे वनगा म्हणाले. त्यांच्या या निर्णयाने नागरिकांमध्ये समाधान आहे. (वार्ताहर)