एमडीच्या ‘कार्पेडियम’ फेस्टमध्ये धम्माल

By Admin | Updated: February 3, 2015 00:28 IST2015-02-03T00:28:22+5:302015-02-03T00:28:22+5:30

हटके उपक्रम आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या परळ येथील एम. डी. कॉलेजच्या ‘बीएमएम’ विभागाचा कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल नुकताच पार पडला.

Dhammal in MD's 'Carpaidium' Fest | एमडीच्या ‘कार्पेडियम’ फेस्टमध्ये धम्माल

एमडीच्या ‘कार्पेडियम’ फेस्टमध्ये धम्माल

मुंबई : हटके उपक्रम आणि वेगवेगळ्या कन्सेप्ट्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या परळ येथील एम. डी. कॉलेजच्या ‘बीएमएम’ विभागाचा कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’ हा आंतरमहाविद्यालयीन फेस्टिव्हल नुकताच पार पडला. कार्पेडियम म्हणजे ‘सिझ द मोमेंट’ त्यामुळे या सिझलिंग फेस्टद्वारे सर्वांच्याच आयुष्यात अनेक लहानमोठ्या शोधांचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंदाच्या कार्पेडियमची थीम ठेवण्यात आली होती ‘अनइन्व्हेंट’. यंदा ‘अनइन्व्हेंट’ म्हणत अगदी आगीपासून ते उडणाऱ्या ड्रोनपर्यंत सर्वच संशोधनांना सॅल्युट करण्यासाठी कार्पेडियम २०१५चे आयोजन करण्यात आले होते.
जवळपास तीन महिने आधीपासून बीएमएम विद्यार्थ्यांनी अतिशय जोमात पूर्वतयारी करीत या फेस्टचे आयोजन केले होते. या फेस्टच्या ‘इन्व्हिटेशनपासून ते टी-शर्टपर्यंत’ सर्व गोष्टींतूनच इनोव्हेटिव्ह इन्व्हेन्शन झळकत होते. वेल प्लॅन्ड टीम, क्रिएटिव्ह माइंडसेट, काहीतरी वेगळे करण्याची ओढ आणि कॉलेजियन्सचा सपोर्ट याचा सुरेख मेळ या फेस्टमध्ये या वेळी पाहायला मिळाला. बीएमएम म्हणजे कलात्मकता आणि कल्पकता हे समीकरण अबाधित राखत ‘कॅप्सट्रॅक्ट, फूट लूज, पिक्टोग्राम, लाइव्ह रिपोर्टिंग, डान्स, फॅशन शो, ड्रामा, रोलिंग रिल, लॅन गेमिंग’ अशा नानाविध इव्हेंट्सचे आयोजन या ‘कार्पेडियम २०१५’ मध्ये करण्यात आले होते. यातही अधिक आकर्षणाचा विषय ठरलेले इव्हेंट्स म्हणजे ‘लाइव्ह रिपोर्टिंग आणि कॅप्सट्रॅक्ट’. कॅप्सट्रॅक्ट या इव्हेंटमध्ये पांढऱ्याशुभ्र गांधीटोपीवर कलाकुसर करताना स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर लाइव्ह रिपोर्टिंगमध्ये कॉलेजियन्सचे पत्रकारितेचे कसब पणाला लागले होते. या इव्हेंटमध्ये अगदी पत्रकारांप्रमाणे घटना (बातमी) सादर करण्याचा अनुभव स्पर्धकांना घेता आला. ‘कार्पेडियम २०१५’ला हटके थीमसोबतच जोड होती सेलीब्रिटी गेस्टची. या फेस्टच्या उद्घाटन सोहळ््याला हजेरी लावली होती बी-टाऊनच्या फेमस आर्ट डिरेक्टर परिचित परळकर यांनी, तर विविध इव्हेंट्स जज करण्यासाठी आले होते डिजे मेल, मॉडेल प्रियंका, फोटोग्राफर ओमकार कोचरेकर यांसारखी सेलेब्स मंडळी. दोन दिवस चाललेल्या कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’ या फेस्टिव्हलला अनेक कॉलेजियन्सनेही भरभरून प्रतिसाद दिला आणि यंदा कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’च्या लढतीत कोण बाजी मारणार, असे वाटत असतानाच बेस्ट कॉलेजची ट्रॉफी पटकावली ती सिद्धार्थ कॉलेजच्या टीमने.
कलात्मकता, ग्लॅमर, धमाल-मस्ती, सामाजिक भान आणि कॉलेजची शान याचे उत्तम मॅशअप यंदाच्या सिझलिंग अशा कार्पेडियम २०१५ ‘अनइन्व्हेंट’मध्ये पाहायला मिळाले. अशा प्रकारे यंदाचा सिझलिंग कार्पेडियम उत्साहात पार पडला.

सर्वांच्याच आयुष्यात अनेक लहानमोठ्या शोधांचे महत्त्व पटवून देण्यासाठी यंदाच्या कार्पेडियमची थीम ठेवण्यात आली होती ‘अनइन्व्हेंट’. जवळपास तीन महिने आधीपासून बीएमएम विद्यार्थ्यांनी अतिशय जोमात पूर्वतयारी करीत या फेस्टचे आयोजन केले होते. महाविद्यालयीन चौकटीबाहेर जात बीएमएम विभागातर्फे प्राचार्या, मुख्याध्यापिका, प्रोफेसर्स यांच्या पाठिंब्याने आणि विद्यार्थ्यांच्या सहभागात अनेक कार्यक्रम राबवण्यात येत असतात़ त्यापैकी कार्पेडियम २०१५ हा सर्वात हिट असा मेगा इव्हेंट ठरला आहे.

Web Title: Dhammal in MD's 'Carpaidium' Fest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.