जिल्ह्यात धुवाधार
By Admin | Updated: July 29, 2014 00:35 IST2014-07-29T00:35:45+5:302014-07-29T00:35:45+5:30
रायगड जिल्ह्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाचे सरासरी प्रमाण १२.४५ मि.मी. असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात पनवेल येथे १७२ मि.मी. अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात धुवाधार
अलिबाग : रायगड जिल्ह्यात १ जून ते २७ जुलैपर्यंत पडलेल्या पावसाचे सरासरी प्रमाण १२.४५ मि.मी. असून गेल्या २४ तासात जिल्ह्यात पनवेल येथे १७२ मि.मी. अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
अलिबाग तालुक्यात गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे अलिबाग - रेवदंडा मार्गावरील नागाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. मुरुडकडून मुंबईस जाणाऱ्या पर्यटकांसह स्थानिक ग्रामस्थांच्या गाड्या व एसटी बसेस अडकून पडल्याचे नागाव ग्रामपंचायतीचे सदस्य विकास पिंपळे यांनी सांगितले.