Join us

Dhadak Zingaat Song Video : धडकमधील 'झिंगाट' गाणं रिलीज, जाळ पण नाही अन् धूर पण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 14:08 IST

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर ''धडक'' सिनेमातील झिंगाट गाणं रिलीज करण्यात आले आहे.

मुंबई : जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर स्टारर 'धडक' सिनेमातील 'झिंगाट' गाणं रिलीज करण्यात आले आहे. धडक हा मराठी 'सैराट' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. 'झिंगाट' गाण्याचं मराठी वर्जन प्रचंड गाजलं होतं. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमातील 'झिंगाट' गाण्याचा 'जाळ अन् धूर' आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. 'सैराट'प्रमाणे धडक सिनेमातील झिंगाट गाणंदेखील एक पार्टी सॉन्ग आहे. यामध्ये जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर धमाकेदार डान्स केला आहे. यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतल्याचंही दिसतंय. हिंदीतील झिंगाट गाणंदेखील अजय-अतुल यांनी गायलं आहे. मराठी झिंगाटदेखील अजय-अतुलनंच गायलं होतं शिवाय गाणं संगीतबद्धही त्यांनीच केले होते. 

तर झिंगाटच्या हिंदी वर्जनचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तर कोरिओग्राफी फराह खाननं केली आहे. गाण्यामध्ये जान्हवीनं लाल व निळ्या रंगाचा लहेंगा परिधान केला आहे. तर ईशानही जान्हवीच्या ड्रेसशी मॅचिंग असा निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. गाण्यामध्ये दोघांनीही धमाकेदार डान्स केला आहे. मात्र मराठी झिंगाटच्या तुलनेत हिंदी झिंगाट गाण्याचा ना जाळ निघाला नाही धूर.... 

('धडक'मधील 'झिंगाट'च्या मराठी व्हर्जनवर नेटकऱ्यांच्या दे धडक प्रतिक्रिया)

टॅग्स :धडक चित्रपटइशान खट्टरजान्हवी कपूर