रेडिमेड सिंहासनाला भक्तांची पसंती
By Admin | Updated: August 25, 2014 01:01 IST2014-08-25T01:01:07+5:302014-08-25T01:01:07+5:30
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणपतीची स्थापना करण्यासाठी आकर्षक मखर किंवा सिंहासनाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

रेडिमेड सिंहासनाला भक्तांची पसंती
पूनम गुरव, नवी मुंबई
अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. गणपतीची स्थापना करण्यासाठी आकर्षक मखर किंवा सिंहासनाची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र यावर्षी थर्माकोलपासून तयार केलेल्या मखरांपेक्षा आर्टिफिशल फुलांनी तयार केलेल्या मखराला अधिक पसंती मिळत आहे.
गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी बाजारपेठेत गणेश भक्तांची खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. नवी मुंबईतील एमपीएमसी मार्केटमध्येही खरेदीसाठी अशीच भक्तांची गर्दी बघायला मिळत आहे. सध्या बाजारात आर्टिफिशिअल फुलांपासून आणि थर्माकोलपासून तयार केलेले मखर बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आर्टिफिशिअल फुलांपासून तयार केलेले मखरही विविध आकारात आणि रंगात मिळत आहेत. तसेच या मखराचा उपयोग झाल्यावर सर्व फुले काढून स्वच्छ धुऊन त्यांचा पुन्हा वापर करता येतो. मात्र थर्माकोलचा वापर वारंवार करता येत नाही. तसेच मखर तयार करताना वापरलेली चकमक काही दिवसातच निघून पडते. त्यामुळे आर्टिफिशल फुलांपासून तयार केलेल्या मखरांना अधिक मागणी आहे. बाजारात मखरांमध्ये प्रसिध्द मंदिरांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत. रेडिमेड व हस्तकलेने बनविलेल्या मखरांचा यामध्ये समावेश आहे. एक हजार ते वीस हजारांपेक्षा जास्त किमतीची मखरे उपलब्ध आहेत. पुरातन मंदिर, विविध आकार तयार केलेले सिंहासन, प्रसिद्ध वास्तू मंदिरे यांचा यामध्ये समावेश आहे.