देवेंद्र यांच्यात दडलाय खेळाडू

By Admin | Updated: October 29, 2014 01:50 IST2014-10-29T01:50:10+5:302014-10-29T01:50:10+5:30

महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करण्यास सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस हे जसे विद्वान राजकारणी म्हणून ओळखले जातात,

Devendras | देवेंद्र यांच्यात दडलाय खेळाडू

देवेंद्र यांच्यात दडलाय खेळाडू

विनय नायडू - मुंबई
महाराष्ट्राचे 22 वे मुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करण्यास सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस हे जसे विद्वान राजकारणी म्हणून ओळखले जातात, तसेच ते खेळाडू म्हणूनही परिचित आहेत. शालेय आणि कॉलेज जीवनात त्यांनी कबड्डी, बास्केटबॉल आणि क्रिकेट असे अनेक खेळ खेळले आहेत.
नागपूरच्या धरमपेठ भागात देवेंद्र हे आपल्या वडिलोपार्जित घरात रहात होते. तेथेच त्यांच्यासोबत लहानपणीचे दिवस एकत्र घालवण्याचा योग माङया नशिबी होता. एकाच भागात रहात असल्यामुळे दोघांचे अनेक कॉमन फ्रेंड होते. टिळकनगर मैदानावर आम्ही सर्व मित्र खेळण्यासाठी जमत होतो. त्यात देवेंद्रही असायचे. देवेंद्र यांचे वैशिष्टय़ असे की, एखादा मित्र त्यांच्या सहवासात आला की त्याला कायमचे आपला करून टाकत असत. मित्रंचा गोतावळा सतत त्यांच्यासोबत असायचा.
लहानपणापासून ते संघाच्या शाखेवर नियमितपणो जात असत. शाखेवर ते कबड्डी खेळायचे. त्यात ते पारंगत बनले होते. त्याशिवाय इतर पारंपरिक खेळही ते उत्तम खेळत. शाखेबाहेर बास्केटबॉल आणि क्रिकेटही आवडीने खेळत होते. क्रिकेटमध्ये हार्डहिटर म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या घराजवळ असलेल्या अपोलो बास्केटबॉल क्लबकडून ते कित्येक वर्षे खेळत होते. 
नगरसेवक झाल्यानंतर ते याच क्लबचे पेट्रेन  होते. 
राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्यापूर्वी जिल्हा बास्केटबॉल असोशिएशनचे ते दोनवेळा अध्यक्ष बनले होते. साधारणत: 1980च्या दरम्यान टिळकनगर मैदानावर टेनिसबॉल नाईट क्रिकेट खेळण्यास त्यांना आवडायचे. त्यांचे जवळचे मित्र आणि माजी रणजीपटू अनिरुद्ध पालकर क्रिकेटशी संबंधित त्यांची आठवण सांगताना म्हणाले, देवेंद्र यांना एकेरी-दुहेरी धावा काढण्यास अजिबात आवडत नसे. चौकार, षट्कार ठोकून प्रेक्षकांना खूश करण्याकडे त्यांचा कल असे.  आता पुढील पाच वष्रे देवेंद्रचे मुंबई हेच निवासस्थान असेल. त्याचे मित्र आणि नागपुरवासिय त्यांना नक्की मिस करतील.
 
कुत्र्याची भीती
 इतर सर्व गोष्टींत पुढाकार घेणारे देवेंद्र कुत्र्याला पाहून मात्र जाम घाबरत असत. कोणाच्या घरी जायचे असेल, तर त्यांच्या घरी कुत्र नाही याची खात्री अगोदर करून घेत असत. आपल्या छोटय़ा सहका:यांना अगोदर पुढे जाऊन कुत्र आहे की नाही, हे तपासण्यास ते सांगत असत. जर कुत्र आहे असे कळले तर ते पुढे जाण्यास धजावत नसत. तुम्हाला जायचे असेल, तर जा, पण मी येणार नाही, असा पवित्र ते घेत.

 

Web Title: Devendras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.