Join us  

"राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 8:47 PM

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपाने नकार दिल्यानंतर निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं.

मुंबई: राज्यातल्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी भाजपाने नकार दिल्यानंतर निवडणुकीत दूसरा पक्ष ठरलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र शिवसेना देखील बहुमताचा आकडा गाठण्यास असमर्थ ठरल्यामुळे आता राज्यपाल काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार असा विश्वास अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

 शिवसेनेची कोंडी; काँग्रेस-राष्ट्रवादीचं पत्र नाहीच, राज्यपालांचाही वेळ वाढवण्यास नकार

नवनीत राणा म्हणाल्या की, शिवसेना व राष्ट्रवादीकडे बहुमत असेल तर त्यांनी सिद्ध करावं, मात्र काहीही झालं तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच होणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला देखील भाजपाचाच मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा 'गेम'?; आता मातोश्रीवर येणार पाठिंबा देण्याची वेळ?

शिवसेनेकडे आज सायंकाळी 7.30 वाजेपर्यत सत्तास्थापनेसाठी वेळ देण्यात आली होती. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसनेला पाठिंब्याचे पत्रचं न पाठविल्याने शिवसेनेची सत्तास्थापनेची संधी हुकलेली आहे. शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळली आहे. यानंतर राज्यपालांनी निवडणुकीत तिसरा पक्ष ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बोलवण्यात आले आहे. त्यामुळे राज्य राष्ट्रपती राजवटीच्या दिशेकडे जातायं का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनवनीत कौर राणाभाजपा