Join us  

मराठा समाजाला आरक्षण देणार, OBC समाजावर अन्याय होऊ देणार नाही- देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 9:14 PM

'सर्वेच्या माध्यमातून आमच्याकडे योग्य डेटा येत आहे.'

Lokmat Maharashtrian of the year awards 2024: आज मुंबईत महाराष्ट्रातील सर्वात मोठा अन् मानाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' अवॉर्ड्स सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि संपादक अतुल कुलकर्णी यांनी घेतली. यावेळी त्यांना मराठा आरक्षणाविषयी विचारण्यात आले. 

आरक्षण देणे आपल्या हातात आहे का?

या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच आहोत, यात ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. काही काळापूर्वी यासंदर्भात वाद उभा झाला होता की, आरक्षण देण्याचा अधिकार केंद्राच्या हातात आहे की, राज्याच्या हातात आहे. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने एक भूमिका घेतली की, हे केंद्राच्या हातात आहे. त्यानंतर केंद्राने एक अमेंडमेंट केली आणि राज्याचे अधिकार राज्याकडे दिले. 

पक्षातील इनकमिंग भाजपाच्या मूळ मतदारांना पटेल का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

मागच्यावेळी आम्ही जे आरक्षण दिले, ते हाय कोर्टात टिकले पण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. सु्प्रीम कोर्टाने त्यावर काही ऑबझर्सवेशन नोंदवले होते. त्यात काही त्रुटी काढल्या होत्या, त्या सर्व त्रुटी दूर करणारा डेटा आमच्या सर्वेच्या माध्यमातून गोळा होत आहे. जो डेटा आमच्याकडे येतोय, तो योग्य आहे. संपूर्ण डेटा आल्यानंतर आम्ही टिकणारे आरक्षण देऊ. हे संपूर्ण मराठा समाज स्वीकारेल, त्यामुळे मनोज जरांगेंनाही तो स्वीकारावा लागेल, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमराठा आरक्षणलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024ओबीसी आरक्षण