Join us  

धक्कादायक! फडणवीसांनी 2014ला सरकार स्थापनेसाठी संख्याबळाची आकडेवारीच दिली नव्हती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 9:21 PM

सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहे

मुंबई : राज्यात महिन्याभरापासून सत्तास्थापनेचे नाट्य सुरू असताना 2014मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडे त्यावेळी बहुमताबाबत संख्याबळाची आकडेवारी दिलेली नव्हती, अशी कबुली राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयाने दिली आहे. त्याबाबत त्यांच्याकडे विचारणाही करण्यात आलेली नव्हती, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सत्तास्थापन करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी विविध पक्षाकडे आमदारांची यादी आणि आकडेवारी मागत आहे , त्यामुळे गेल्या निवडणुकीवेळी कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसताना सरकार स्थापन करण्यासाठी कोणती पद्धत अवलंबण्यात आली होती, अशी विचारणा आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी त्याबाबत राज्यपालांच्या कार्यालयाकडे ‘माहिती अधिकार कायद्यान्वये केली होती.

माहिती कायद्यान्वये, २८ ऑक्टोबर २०१४ रोजी संध्याकाळी ६.४० वाजता प्राप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राची प्रत दिली आहे. त्यामध्ये फडणवीस यांच्यासह एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे-पालवे या भाजपा कोअर कमिटी सदस्यांची स्वाक्षरी असलेल्या पत्राची प्रत दिली. त्यामध्ये तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना कळविण्यात आले की भारतीय जनता पार्टी ही या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याने आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, ’इतकेच नमूद करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना निमंत्रित करण्यात आले. त्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ व आमदारांची यादी मागण्यात आली नाही.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपाशिवसेना