वसईत १५० कोटींच्या विकासकामांचा धडाका

By Admin | Updated: May 12, 2015 23:07 IST2015-05-12T23:07:53+5:302015-05-12T23:07:53+5:30

वसई विरार शहर महानगरपालिकेची पुढील महिन्यात होणारी निवडणूक लक्षात घेता सध्या १५० कोटींच्या विकासकामांचा धूमधडाका सुरु आहेत.

The development of Vasai 150 crore development works | वसईत १५० कोटींच्या विकासकामांचा धडाका

वसईत १५० कोटींच्या विकासकामांचा धडाका

वसई : वसई विरार शहर महानगरपालिकेची पुढील महिन्यात होणारी निवडणूक लक्षात घेता सध्या १५० कोटींच्या विकासकामांचा धूमधडाका सुरु आहेत. मागील १५ दिवसात अनेक विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कामांचा खर्च सुमारे १५० कोटींच्या घरात पोहोचला आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विकासकामे करणे शक्य होणार नसल्याने महासभेत शेकडो कोटींच्या विकासकामांना मंजुरी घेण्यात आली आहे. महानगरपालिकेची मुदत २७ जून रोजी संपत असून १५ ते २० जूनदरम्यान निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या असल्या तरी निवडणूक वेळेवर होतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. सध्या मंजूर करून घेतलेले कामे जोरात सुरु आहे. मच्छीमार्केट, रस्त्यांचे नूतनीकरण, निधीचे वाटप व अन्य विकासकामांचा यात समावेश आहे. काही प्रभागातील प्रलंबित विकासकामेही मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. विकासकामांमुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

Web Title: The development of Vasai 150 crore development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.