Join us

गावागावांत विकासाची स्पधो; ५ कोटंचि पारितोषिक; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 12:18 IST

लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक करताना 'लोकमत'चे माझ्या राजकीय जडणघडणीत मोठे योगदान असल्याची प्रांजळ कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

मुंबई: राज्य आणि केंद्राच्या योजनांची अधिकाधिक अंमलबजावणी करणाऱ्या गावांसाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धेची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात केली. यानिमित्ताने गावोगावच्या विकासातही स्पर्धा सुरू करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. 'लोकमत सरपंच अवॉर्ड'च्या माध्यमातून आधीच करत आहात, असे गौरवोद्‌गार त्यांनी काढले.

ते म्हणाले, मी चार वेळा आमदार झाली. सामान्य कुटुंबातून, गावखेड्यातून येऊन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज ग्रामविकास मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे गावाला काय हवं असतं, याची माहिती मला आहे. त्यामुळे गावागावात विकासाची स्पर्धा झाली पाहिजे, या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या अनेक वेगवेगळ्या योजना आहेत. त्या योजनांची १०० टक्के अंमलबजावणी झाली तरी गावातील ६०-६५ टक्के कामे संपलेली असतील. त्यामुळे योजनांची जास्तीत जास्त आणि प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या तालुका स्तरावरील गावाला २५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हापातळीवर ५० लाख विभागातील पहिल्या गावाला १ कोटी रुपये आणि राज्यात पहिल्या क्रमांकाच्या गावाला ५ कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री गोरे त्यांनी सांगितले.

राजकीय जडणघडणीत 'लोकमत'चे मोठे योगदान

लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक करताना 'लोकमत'चे माझ्या राजकीय जडणघडणीत मोठे योगदान असल्याची प्रांजळ कबुली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

विविध विभागांत सरपंचांनी केलेल्या कामावर आधारित प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र पुरस्कार देण्यात आला. आश्वासक काम उभी करणाऱ्या सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

आजचा सरपंच हा भविष्यातील मुख्यमंत्री : राजेंद्र दर्डा

सरपंच हा गावचा कर्णधार असतो. तो हुशार असेल तर त्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि विसरू नका, आजया सरपंच हा भविष्यातील मुख्यमंत्री आहे, असे मत 'लोकमत' समूहाचे एडिटर इन चीफ आणि माजी उद्योग आणि शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी वाक्त केले, तसेच, 'भी मंत्री असताना माझे जे पहिले मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते, तेही सरपंचपदापासून मुख्यमंत्री झाले होते, अशी आठवणही दर्डा यांनी सांगितली.

'लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्याचे अध्यक्ष या नात्याने दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 'लोकमत सरपंच पुरस्कारा'चे हे चौथे वर्ष समजून 'लोकमत'ने आजवर सामाजिक बांधीलकी, सामाजिक सौहार्द आणि समाजातील शेवटच्या घटकाचे हित जोपासण्याचे काम आजपर्यंत केले आहे. समाजातील अनिष्ट प्रवृत्तीविरुद्ध कठोर भूमिका घेत असतानाच समाजामध्ये जो पुरुषार्थ आहे, तो पुरुषार्थ क्षीण होता कामा नये, संपता कामा नये, अशी भूमिका 'लोकमत'चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांनी वेळोवेळी मांडली होती आणि तीच दक्षता आम्ही घेत आहोत. सरपंचांना ग्रामपंचायतीला कसे काय विसरू शकतो? त्यामुळे त्यांचा गौरव व्हावा ही संकल्पना त्या काळात 'लोकमत'चे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडली होती आणि हे सांगायला मला आनंद होतो महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींकडून 'लोकमत'च्या या उपक्रमात जिल्हास्तरावर भाग घेतला, अशी माहिती राजेंद्र दर्डा यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ बी. के. टी. कंपनीने दोन भव्य टायर ठेवून फोटो कॉर्नर तयार केला होता. या ठिकाणी फोटो

काढण्यासाठी गर्दी झाली होती.

कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना प्रायोजकांकडून भेट्यस्तू देण्यात आल्या. भेटवस्तू दिल्याबद्दल त्यांनी 'लोकमत' आणि प्रायोजकांचे आभार व्यक्त केले.

सोहळ्यासाठी आलेल्या सरपंच आणि सहकान्यांचे सोहळ्यानंतर कार्यक्रमस्थळी मोठ्या उत्साहात फोटोसेशन सुरू होते.

कार्यक्रमाची आठवण राहावी व यातून नेहमी प्रेरणा मिळावी यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात येत असताना त्यांचे सहकारी फोटो व व्हिडिओ शूटिंग करत होते.

पुरस्कार सोहळ्यानंतर लोकमतच्या विविध माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना पुरस्कार प्राप्त सरपंच भावुक झाले होते. हा क्षण चित्रीत करण्यासाठी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये चढाओढ लागली होती.

कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ बी. के.टी. कंपनीने दोन भव्य टायर ठेवून फोटो कॉर्नर तयार केला होता. या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचलन कुणाल रेगे यांनी केले.

टॅग्स :लोकमत